Old Wada collapsed in Old Nashik Gaavthan area | जुन्या नाशकातील गावठाण भागात  जुना वाडा कोसळला
जुन्या नाशकातील गावठाण भागात  जुना वाडा कोसळला

नाशिक : जुन्या नाशकातील गावठाण भागात संभाजी चौक परिसरातील काकडे वाडा शुक्रवारी (दि.२८) सकाळी ६ वाजेच्या सुमारास कोसळला. या इमारतीत एका ज्येष्ठ महिलेसह चार जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाड्यात अडकलेल्या चौघांचीही सुटका केली असून, यातील तीनजण किरकोळ जखमी झाले आहे.
काकडेवाड्याच्या दोन मजली इमारतीचा (घर क्रमांक-१९६७) काही भाग कोसळून त्याखाली तीन जण दाबले गेल्याचे आणि वयस्क महिला वाड्यात अडकल्याचे बचाव पथकाच्या लक्षात आल्याने बचाव पथकाने तत्काळ बचाव कार्य सुरू करीत अन्य केंद्रांचीही मदत मागविली. दरम्यानच्या काळात बचाव पथकाच्या जवानांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडलेल्या पीडितांना बचाव कार्याला सुरुवात करून पीडिताना सुखरूप वाचविण्यात यश मिळविले. वाड्यात अडकलेल्या ज्येष्ठ महिला कलावती गिते (८०) यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. या घटनेत कलावती कल्पना कुंभकर्ण (५५), अमोल कुंभकर्ण (२२) व सतीश कुंभकर्ण (६५) हे एकाच कुटुंबातील तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.


Web Title:  Old Wada collapsed in Old Nashik Gaavthan area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.