जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:41 IST2017-11-06T16:40:55+5:302017-11-06T16:41:05+5:30

The old quarrel has been tricked and thrown by three men | जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांकडून मारहाण

जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघांकडून मारहाण


नाशिक: जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि़२) सायंकाळी सिन्नरफाट्यावरील विष्णुनगरमध्ये घडली़
गोदरेडवाडी येथील रहिवासी अश्पाक सलीम शेख यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित सचिन महाजन, रोहित ताजनपुरे व महाजन यांच्या कामावरील गडी या तिघांनी कुरापत काढून बेदम मारहाण केली़, तर महाजन याने लोखंडी रॉड डोक्यात घातल्याने गंभीर दुखापत झाली आहे़
याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The old quarrel has been tricked and thrown by three men