जुन्या नोटांचे १२ कोटींचे व्याज घेतले परत
By Admin | Updated: March 28, 2017 01:51 IST2017-03-28T01:51:32+5:302017-03-28T01:51:51+5:30
नाशिक : नोटाबंदीमुळे जमा झालेले सुमारे ३४१ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे सदस्यांना दिलेले सुमारे १२ कोटींचे व्याज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने सदस्यांच्या खात्यातून वर्ग केल्याचे वृत्त आहे.

जुन्या नोटांचे १२ कोटींचे व्याज घेतले परत
नाशिक : नोटाबंदीमुळे जमा झालेले सुमारे ३४१ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे सुमारे एक लाखाहून अधिक सदस्यांना दिलेले सुमारे १२ कोटींचे व्याज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने तडकाफडकी सदस्यांच्या खात्यातून जिल्हा बॅँकेकडे वर्ग केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, लोकमतने २५ मार्चच्या अंकात ‘नोटाबंदीमुळे जिल्हा बॅँकेला १५ कोटींचा फटका?’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून या प्रकाराकडे लक्ष वेधले होते. याची जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळ आणि प्रशासनाने गंभीर दखल घेत या ३४१ कोटींच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बॅँक स्वीकारत नसल्याने सभासदांना तीन महिन्यांचे या रकमेचे व्याज दिल्यास त्याचा बोजा जिल्हा बॅँकेवर पडणार असल्याचे पाहून घाईगर्दीत शनिवारीच (दि.२५) सभासदांच्या खात्यावर वर्ग केलेल्या सुमारे १२ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा बॅँकेकडे परस्पर वर्ग केल्याचे समजते. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी काढण्यात आलेल्या रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशानुसार चलनातून बाद झालेल्या हजार व पाचशेच्या जुन्या नोटा तब्बल तीन महिन्यांहून अधिक काळ पडून असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेला सुमारे १२ ते १५ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे वृत्त आहे. नोव्हेंबरमध्ये नोटा स्वीकारण्यासाठी दिलेल्या मुदतीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या जिल्हाभरातील शाखांमध्ये कर्ज व ठेवींच्या रूपात चार दिवसांत तब्बल ३४१ कोटींच्या गंगाजळी जमा करण्यात आल्या. जिल्हा बॅँकेच्या जुन्या मध्यवर्ती इमारतीत असलेल्या स्ट्रॉँगरूममध्ये हजार व पाचशेच्या तब्बल ३४१ कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत. रिझर्व्ह बॅँकेने राष्ट्रीय तसेच शेड्युल बॅँकांना विहित मुदतीत नोटा बदलून दिल्या. मात्र जिल्हा बॅँकेच्या ३४१ कोटींच्या नोटा बदलून देण्याबाबत अद्यापही निर्णय झाला नसल्याने या नोटा तशाच पडून आहेत. ही सर्व ३४१ कोटींची रक्कम बहुतांश ठेवींच्या रूपात असल्याने जिल्हा बॅँकेला ठेवींच्या रूपात मिळू शकणारा या रकमेवरील सुमारे १२ ते १५ कोटींचे व्याज बुडाल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर याच ठेवींपोटी संबंधित ठेवीदारांना जिल्हा बॅँकेला आता या तीन ते चार महिन्यांच्या व्याजाचा भुर्दंडही माथी बसणार असल्याची चर्चा होती.
आता जिल्हा बॅँकेने दिलेल्या व्याजाची १२ कोटींची रक्कम परस्पर वळती केल्याने जिल्हा बॅँकेचा होऊ शकणारा १२ कोटींचा तोटा वाचल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)