नाशिक : शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला असून रविवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ६१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. शहराचा आकडा आता ४२७ पर्यंत पोहचला आहे. यापैकी २४ रुग्ण जुने नाशिक भागात आहेत. जुने नाशिक परिसर शहराचा नवा हॉटस्पॉट बनला असून हा संपुर्ण परिसर तत्काळ महापालिकेने ‘कन्टेंन्मेंट झोन’ म्हणून ‘सील’ करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा भागात रविवारी १९ रुग्ण मिळून आले. दोन दिवसांपुर्वीच नाईकवाडीपुरा भागात एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला होता. दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला जात असून राज्य शासनाच्या आदेशान्वये मनपा प्रशासन ‘मिशन बिगेन अगेन’ राबविण्याचा प्रयत्ना आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे. शहरातील एकूणच व्यवहार सुरळीत होत असून शनिवारी शहरातील बाजारपेठा अचानकपणे गजबजून गेलेल्या दिसून आल्या. लोकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आणि कोरोनापासून बचावासाठी राज्य सरकारकडून सुचविलेले सर्वच उपाययोजना आणि नियम पायदळी तुडविले गेल्याचे चित्र पहावयास मिळाले, जर अशीच परिस्थिती राहिली तर ही मोठ्या धोक्याची घंटा ठरू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.--...येथे आढळले आज ६१ रूग्णनाईकवाडीपुरा - १० पुरूष ९ महिलाकोकणीपुरा - १दुधबाजार-त्र्यंबक दरवाजा-१बागवानपुरा-१मदिना चौक -३भाभानगर- १वडाळारोड-१पखालरोड- ७स्वास्तिकनगर (पखालरोड)-१टाकळीरोड - ४काठेगल्ली- २अशोकामार्ग-१राजरत्ननगर (सिडको)-२शिवशक्ती चौक-१सातपूर कॉलनी- ५सातपूर-१दिंडोरीरोड-१भगवतीनगर, हिरावाडी-२भराडवाडी- २ (महिलेसह ६ महिन्याचे तान्हुळे बाळ)स्नेहनगर, म्हसरूळ - ३खासगी रुग्णालय (साईनाथनगर)-२
जुने नाशिक ‘हॉटस्पॉट’ : शहरात आढळले ६१ कोरोनाबाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 22:29 IST
दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जुने नाशिक ‘हॉटस्पॉट’ : शहरात आढळले ६१ कोरोनाबाधित रूग्ण
ठळक मुद्देनाईकवाडीपुरा भागात रविवारी १९ रुग्णमोठ्या धोक्याची घंटा ठरू शकतेमनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान शहराचा आकडा आता ४२७ पर्यंत पोहचला