शिंगवे येथील वृध्देचा खून

By Admin | Updated: June 17, 2014 00:09 IST2014-06-16T23:45:37+5:302014-06-17T00:09:04+5:30

शिंगवे येथील वृध्देचा खून

Old age blood of horns | शिंगवे येथील वृध्देचा खून

शिंगवे येथील वृध्देचा खून

 चांदवड : मतोबाचे शिंगवे येथील ६७ वर्षीय वृध्देचा आपल्या लहान भावाबरोबर विवाह लावून दिल्याचा राग मनात धरून बाभळीच्या झाडाच्या दांडक्याने वार करून ठार मारले याबाबत शिंगवे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शिंगवे येथील कु. दीपाली प्रकाश खैरनार (१३) हिने चांदवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शरद आंनदा चव्हाण, रा. चिंचविहीर, ता. नांदगाव यांनी सोमवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास शिंगवे गावलगत शिवाजी वामन खताळ यांच्या शेतातील गट नंबर १९ मधील दीपाली खैरनार यांच्या राहत्या घरासमोर आपली आजी हिराबाई वामन खताळ हिने दीपालीची बहीण कोमल हिचा विवाह शरद आनंदा चव्हाण याचा लहान भाऊ युवराज आनंदा चव्हाण याचेबरोबर करून दिल्याच्या कारणावरून शरद चव्हाण यास राग आला. म्हणून आजी श्रीमती हिराबाई खताळ (६७) या झोपेत असताना तिच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने जोरात प्रघात करून जीवे ठार मारले अशी फिर्याद दिल्याने याबाबत चांदवड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मगर हे तपास करीत आहेत.




दरम्यान घटनास्थळी मालेगाव विभागाचे अपर पोलीस अधिक्षक सुनील कडासणे, मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक नरेश मेघराजानी यांनी भेट घेऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. (वार्ताहर).

Web Title: Old age blood of horns