नाशिक-पेठ मार्गावर आॅइल टॅँकर पलटला
By Admin | Updated: February 19, 2017 23:15 IST2017-02-19T23:14:59+5:302017-02-19T23:15:17+5:30
सांडलेले आॅईल भरून नेण्यासाठी नागरिकांची गर्दी

नाशिक-पेठ मार्गावर आॅइल टॅँकर पलटला
पेठ : नाशिक- पेठ मार्गावर शासकीय विश्रामगृहानजीकच्या वळणावर पेठकडून नाशिककडे जाणारा आॅइल भरलेला टॅँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. नाशिककडे जाणारा आॅइलचा टॅँकर क्र मांक एमएच ०४ जीसी९२५७ रस्त्यालगत पलटी झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरीही टॅँकरमधील आॅइल खड्ड्यात झिरपल्याने डबक्याचे स्वरूप आले होते. साचलेले आॅइल भरून नेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यामुळे सर्वत्र आॅइलचे तळे साचले होते. नागरिकांनी मिळेल त्या भांड्यामध्ये व डब्यामध्ये आॅइल भरून नेले. (वार्ताहर)