शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम प्रस्ताव स्वीकारणार आॅफलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 01:12 IST

शहरातील विकासक आणि वास्तुविशारदांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआरच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने अखेरीस आयुक्तांनी नवा निर्णय घेतला आहे. बांधकामांच्या आॅनलाइन प्रस्ताव दाखल केल्यानंतर आॅटोडिसीआरच्या सॉप्टटेक इंजिनिअर्स कंपनीमार्फत तीन दिवसांच्या आत छाननी न झाल्यास असे प्रस्ताव आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांबरोबच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक : शहरातील विकासक आणि वास्तुविशारदांची डोकेदुखी ठरलेल्या आॅटोडीसीआरच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने अखेरीस आयुक्तांनी नवा निर्णय घेतला आहे. बांधकामांच्या आॅनलाइन प्रस्ताव दाखल केल्यानंतर आॅटोडिसीआरच्या सॉप्टटेक इंजिनिअर्स कंपनीमार्फत तीन दिवसांच्या आत छाननी न झाल्यास असे प्रस्ताव आॅफलाइन पद्धतीने स्वीकारण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांबरोबच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.इतकेच नव्हे तर विलंबाकरिता दंड म्हणून तीन दिवसांच्या मुदतीनंतर प्रस्तावाच्या छाननी शुल्काइतकी रक्कम कंपनीकडून वसूल करण्याची सूचनाही आयुक्त गमे यांनी नगररचना विभागाला केली आहे. त्यामुळे संबंधित कंपनीलादेखील दणका देण्यात आला आहे. महापाालिकेने १ जून २०१७ मध्ये सुरू केलेल्या आॅटोडिसीआर म्हणजेच आॅनलाइन प्रस्ताव छाननी आणि मंजुरीसाठीच्या व्यवस्थेमुळे महापालिकेच्या नगररचना विभागात वेगाने काम होईल तसेच पारदर्शक काम होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात घडले उलटेच. आॅटोडिसीआरमध्ये प्रस्ताव दाखल होत नाही, दाखल झालेच तर लवकर मंजूर होत नाही. विशेषत: परवानग्या नाकारण्याचे प्रमाण मोठे होते. शिवाय वारंवार रिजेक्शन होत असल्याने दरवेळी स्क्रुटींनी फी भरावी लागत असे. यानंतरही परवानगी किंवा दाखला मिळेलच याची शाश्वती नव्हती. प्रस्ताव मंजूर झाले.कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची तयारीमहापालिकेने अगोदरच आॅटोडिसीआर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा यापूर्वीच दिला होता. आता त्या दृष्टीनेच तयारी सुरू झाली आहे. लवकरच संपूर्ण राज्यासाठी युनिफाइडी डीसीपीआर लागू होत असून, अशावेळी महापालिकेला आॅटोडिसीआरची तशीही गरज भासणार नाही. त्यामुळे महापालिकेने अशाप्रकारचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका