The officials were shocked to hear the farmers' agony! | शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून अधिकारीही हेलावले !

शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून अधिकारीही हेलावले !

लासलगाव : द्राक्षावर फवारलेल्या महागड्या औषधी बाटल्यांची किंमत बघा साहेब , आमचा संपूर्ण केलेला खर्च पाण्यात गेला आहे, तुम्ही सरकारपर्यंत आमची मागणी मांडा व आम्हाला चार पैसे योग्य द्या, नाहीतर आम्हाला हेच औषध पुन्हा विकत घेऊन पिण्याची वेळ येईल याचा गांभीर्याने विचार करावा अशी नुकसानग्रस्त खडकमाळेगाव येथील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकापुढे व्यथा मांडली आणि हे ऐकुन पथकातील अधिकारीही हेलावले.
अवकाळी पावसाने निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी तब्बल २० दिवसानंतर केंद्रीय पथकाकडून करण्यात आली. शुक्र वारी या पथकाने निफाड तालुक्यातील पाचोरे वणी व खडक माळेगाव येथील द्राक्षबागा, सोयाबीन व मका या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकºयांशी चर्चा केली.
आॅक्टोबर महिन्याच्या अखेरीस अवघ्या नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले. यात द्राक्ष, कांदा, गहू, मका, सोयाबीन, भुईमूग या सर्वच प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. समितीतील दिनानाथ व सुभाष चंद्रा यांच्यासमवेत नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने सहभागी झाले होते. तसेच निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ अर्चना पठारे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील , तालुका कृषी अधिकारी तलाठी यांच्यासह अधिकार्यांचा फौजफाटा घेत या दोन अधिकाºयांनी निफाड तालुक्यातील पाचोरे वणी व खडक माळेगाव येथील पिकांची पाहणी केली.
पाचोरे वणी येथील भास्कर वाटपाडे यांच्या सोयाबीन पिकाची तर बाजीराव वाटपाडे यांच्या द्राक्ष पिक व बाळू वाटपाडे यांच्या मका पिकाची पाहणी करून त्यांनी या शेतकºयांनी किती उत्पादन करण्यात आले होते व नुकसान किती झाले याची पूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली.
खडक माळेगाव येथील ज्ञानेश्वर शिंदे व संतोष शिंदे त्यांच्या द्राक्ष बागेत अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. या ठिकाणी पथकाने जाऊन पहाणी केली. जवळच असलेल्या त्यांच्या मिरचीच्या शेताची पाहणी करत नुकसानीची माहिती जाणून घेतली.

Web Title:  The officials were shocked to hear the farmers' agony!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.