अधिकाऱ्यांची ओळख परेड बैठक

By Admin | Updated: January 24, 2017 00:25 IST2017-01-24T00:25:01+5:302017-01-24T00:25:16+5:30

निवडणूक तयारी : विभागवार कार्यभार नियोजनाविषयी चर्चा

Officers Identification Parade Meeting | अधिकाऱ्यांची ओळख परेड बैठक

अधिकाऱ्यांची ओळख परेड बैठक

नाशिक : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी विविध निवडणूक अधिकाऱ्यांसह सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागवार कार्यभाराविषयी माहिती जाणून घेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची ओळख परेड जाणून घेतली. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीसह उपलब्ध यंत्रणा व साधनसामग्री विषयीही चर्चा करण्यात आली.  महापालिका निवडणूक २०१७च्या नियोजनाचा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी आढावा घेतला. तसेच निवडणूक तयारीविषयी निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयांसह निवडणूक काळात आवश्यक यंत्रणेविषयी माहिती घेतली. यावेळी महापालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी, असे सुमारे ७० अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांविषयीही चर्चा झाली असून, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाची तयारी व नियोजनाचा आयुक्तांनी आढावा घेतला. बैठकीत संवेदनशील व अतिसंवेदनशील प्रभागांविषयीही चर्चा झाली असून, शहरातील विविध प्रभागांच्या निवडणूक काळातील इतिहासाचा अभ्यास करून संवेदनशील व अतिसंवेदनशील प्रभाग निश्चित करण्यात येणार आहे. सोबतच मद्यविक्री व मद्याचा काळाबाजार यावरही प्रशासनाकडून कटाक्षाने नजर ठेवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Officers Identification Parade Meeting