पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST2021-09-02T04:30:19+5:302021-09-02T04:30:19+5:30
सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व प्रभाग सभा घेण्यात आली. यावेळी डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरियाचे रुग्ण दिवसागणिक वाढत ...

पूर्व प्रभाग समितीच्या सभेत अधिकारी धारेवर
सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व प्रभाग सभा घेण्यात आली. यावेळी डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरियाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. धूर व औषधफवारणी नियमित होत नसल्याने आणि मोकळ्या भूखंडावरील गाजर गवत काढले जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची तक्रार सुषमा पगारे व चंद्रकांत खोडे यांनी केली, तसेच अतिक्रमण विभागास रस्त्यावरील बसणारे भाजीविक्रेते, अनधिकृत होर्डिंग्ज दिसत नाहीत. फक्त नगरसेवकांनी लावलेल्या होर्डिंग्जवरच कारवाई करण्यात येत असल्याची तक्रार पगारे यांनी केली. प्रभाग क्रमांक ३० मधील रस्त्यावर लहान मोठे-खड्डे निर्माण झाले आहेत, तसेच गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी केलेले खोदकाम शिव कॉलनी परिसरात व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळेस तक्रार करूनही रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येत नाहीत. अधिकारी ठेकेदारांची बाजू घेतात. वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचची मागणी करूनसुद्धा त्याची दखल घेतली जात नसल्याची तक्रार ॲड. श्याम बडोदे यांनी केली.
डेंग्यू, चिकुनगुनिया व मलेरियाचे पेशंट घराघरांत असून, त्याचे गांभीर्य अधिकाऱ्यांनी ओळखून प्रत्येक सोसायटी व कॉलनीत औषध व धूरफवारणी नियमित करावी, तसेच लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना कमी न करता त्यांना कामावर राहू द्यावे, जेणेकरून लसीकरण केंद्रावर त्याचा परिणाम होणार नाही, असे ॲड. अजिंक्य साने यांनी सांगितले. वॉटर ग्रेसचे सफाई कर्मचारी प्रभागांमध्ये स्वच्छता न करता एका ठिकाणी बसले असता त्यांना नगरसेवकांनी स्वच्छता करण्याचे सांगितलेले काम ऐकत नाहीत, अशी तक्रार सदस्यांनी केली.