आदिवासी चिमूकल्यांसह अधिकारीही रंगले शाडू मुर्तीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 18:29 IST2019-08-29T18:29:16+5:302019-08-29T18:29:39+5:30
पेठ : पर्यावरण संरक्षणासाठी व प्लास्टर आॅफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्र म म्हणून जोगमोडी बीटमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणगाव येथे इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

हरणगाव ता. पेठ येथे जोगमोडी बीटाच्या वतीने आयोजित शाडू माती गणपती निर्मिती प्रसंगी अनिल नागणे, सरोज जगताप, सुनिता जाथव, संजय वाणी, दिलीप डगळे आदी.
पेठ : पर्यावरण संरक्षणासाठी व प्लास्टर आॅफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्र म म्हणून जोगमोडी बीटमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणगाव येथे इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
हरणगाव शाळेच्या परिसरात झालेल्या या कार्यशाळेला प्रत्येक शाळेतील एक शिक्षक आणि दोन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळा प्रशिक्षक रमेश वाघ, तुषार चौधरी, यादव घांगळे, देवदत्त चौधरी, रवींद्र बोरसे यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवले. गणपतीच्या मूर्तीचा बेस कसा बनवायचा, पाय कसे तयार करायचे, मातीच्या गोळ्यापासून पोट कसे तयार करायचे, हात कसे बनवायचे, कपाळावर मध्यभागी सोंडेचा आकार कसा द्यायचा, याबाबत अत्यंत सोप्या पध्दतीने त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्र माला पेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत न राहता प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभागी होत मूर्ती बनवली.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जोगमोडी बिटाच्या विस्तार अधिकारी सुनिता जाधव, दीपक पाटील, हिरामण ठाकरे, उमेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.