सर्वधर्मतीर्थ गोदेला अर्पण
By Admin | Updated: September 25, 2015 23:52 IST2015-09-25T23:51:24+5:302015-09-25T23:52:02+5:30
विश्वशांती कें्रद : माईर्सतर्फे विश्वधर्म भारतीय संस्कृती दर्शन दिंडी

सर्वधर्मतीर्थ गोदेला अर्पण
नाशिक : श्री काळाराम मंदिराच्या साक्षीने जगातील ९ धर्मग्रंथ आणि ३६ पवित्र सर्व धर्मतीर्थांच्या जलांचा मंगल-अमृतकलश घेऊन निघालेली पालखी, सर्वधर्मगुरुंच्या प्रतिमांचा वाहनरथ, टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगवेझेंडे नाचवत ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष करीत दिंडीत नाचणारे वारकरी, रामकुंडात गोदेला अर्पण केलेले सर्वधर्मतीर्थ.. असा हा अनुपम्य सोहळा शुक्रवारी सकाळी नाशिकच्याच नव्हे तर राज्या-परराज्यातील भाविकांनी अनुभवला. निमित्त होते अर्थात आळंदीच्या विश्वशांती केंद्र व पुण्याच्या माईर्स एमआयटी संस्थेने आयोजित केलेल्या विश्वधर्म भारतीय संस्कृती ज्ञानदर्शन सोहळ्याचे. श्री काळाराम मंदिरात सकाळी माईर्स एमआयटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अयोध्याच्या श्रीराम जन्मभूमी शिलान्यासचे रामविलास वेदांती महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुुरू डॉ. वसंतराव शिंदे यांच्या हस्ते जगातील ३६ नद्यांच्या पवित्र जलाचे पूजन करून कलशात टाकण्यात आले.
तसेच जगातील नऊ धर्मग्रंथांचे पूजन करण्यात आले, याप्रसंगी डॉ. कराड म्हणाले की, भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान व परंपरांचे जगाला दर्शन घडावे आणि विश्वशांती नांदावी यासाठी हा सोहळा होत आहे. त्यानंतर सर्व पवित्र नद्यांचे जल एकत्र केलेला मंगल अमृतकलश व विविध नऊ धर्मग्रंथ पालखी व वाहनरथावर ठेवण्यात आले.