शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

प्रस्तावच विलंबित !

By किरण अग्रवाल | Updated: January 13, 2019 01:45 IST

विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडण्यास कारणीभूत ठरल्यामुळे जिल्हा परिषदेत निलंबनास्र उगारले जाऊन काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या असतानाच, यंदा जिल्हा विकास निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे याप्रकरणी कुणास जबाबदार धरून काय कारवाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.

ठळक मुद्देउपलब्ध निधी खर्ची कसा पडेल, याची चिंता संबंधिताना लागून राहिली आहे.योजनेसाठीची तरतूद कमी व बजेट अधिक, असेही घडून येते. त्यामुळे फायलींचाच प्रवास या टेबलावरून त्या टेबलावर सुरू राहतो.मार्चअखेरीस घाईघाईत वर्कआॅर्डर काढल्या जातील तर कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होईल.

विकासकामांची निविदा प्रक्रिया रखडण्यास कारणीभूत ठरल्यामुळे जिल्हा परिषदेत निलंबनास्र उगारले जाऊन काहींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या गेल्या असतानाच, यंदा जिल्हा विकास निधीही मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे आहेत; त्यामुळे याप्रकरणी कुणास जबाबदार धरून काय कारवाई केली जाते, असा प्रश्न उपस्थित होणे गैर ठरू नये.शासनाच्या विविध योजनांतर्गत खर्चासाठी मंजूर निधीमधील सुमारे ७० टक्के रक्कम डिसेंबरअखेर उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु प्रत्यक्षात कामांवर होणारा खर्च व त्यासंदर्भातील प्रशासकीय मान्यतांचे प्रमाण खूप कमी असल्याने हा उपलब्ध निधी खर्ची कसा पडेल, याची चिंता संबंधिताना लागून राहिली आहे. अर्थात, लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने त्यानंतर नवीन कामांना मंजुरी मिळू शकणार नाही, असे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. अजूनही काही विभाग असे आहेत ज्यांनी प्रस्तावच पाठविलेले नाहीत, त्यामुळे ही भीती खरीच ठरण्याची चिन्हे आहेत. तेव्हा प्रस्ताव न पाठवून हाताची घडी घालून बसलेल्या स्वस्थाधिकाऱ्यांवर कुणी काही कारवाई करणार की नाही? जनता विकासासाठी आसुसलेली आहे, शासनानेही त्याकरिता योजना आखून निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु त्यासाठी उपयुक्त ठरू शकणारे प्रस्ताव तयार करून ते वेळेत पाठविले जात नसतील तर संबंधितांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्या हाताची घडी सोडविणे गरजेचे आहे. अनेक प्रस्ताव येतात तर त्यात अपूर्णता असते. योजनेसाठीची तरतूद कमी व बजेट अधिक, असेही घडून येते. त्यामुळे फायलींचाच प्रवास या टेबलावरून त्या टेबलावर सुरू राहतो. यातील दोषी हेरले जावयास हवे. कारण, आता मार्चअखेरीस घाईघाईत वर्कआॅर्डर काढल्या जातील तर कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होईल. अलीकडेच नियोजन समितीच्या एका कारकुनानेच खासदाराच्या नावाने प्रस्ताव करून मंजुºयाही घेऊन ठेवल्याचे आढळून आले होते, तशा प्रकारांना संधी मिळू नये म्हणून प्रस्तावांच्या पातळीवरील विलंब टाळला जाणे हाच यावरील उपाय ठरेल. त्याकरिता त्या त्या विभागांतर्गत जबाबदारीची निश्चिती होणे गरजेचे आहे. अन्यथा, दरवर्षाचे हेच आणि असेच घडून येण्याचे चक्र भेदता येणार नाही. 

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषद