The offense of asking a bribe against the health officials | आरोग्याधिकारी डेकाटेंविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा
आरोग्याधिकारी डेकाटेंविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय नथूजी डेकाटे यांच्या विरोधात दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध शनिवारी (दि. १५) भद्रकाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार २०१६ पासून जिल्ह्यात तालुक्याचे आरोग्याधिकारी म्हणून कार्यरत आहे. आॅक्टोबर २०१८ पासून त्यांची वेतनवाढ कमी आकारण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी डेकाटे यांची भेट घेऊन पगारवाढीबाबत सांगितले. (पान ३ वर)

यावेळी डेकाटे यांनी त्या मोबदल्यात २५ हजार रु पयांची लाचेची मागणी केली. तक्र ारदारानेही ५ हजार रुपये काढून देत उर्वरित रक्कम नंतर देण्याचा बहाणा करून काढता पाय घेतला. त्यानंतर तक्र ारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्र ार केली. दरम्यान, दहा हजार रुपयांची तडजोड करण्यात आली. हा सर्व प्रकार विभागाच्या पंचासमोर घडला. याबाबतचे ध्वनिमुद्रण केले गेले. मात्र याबाबतची कुणकुण लागल्याने डेकाटे यांनी रक्कम स्वीकारली नाही. मात्र वेतनवाढीच्या मोबदल्यात लाचेच्या स्वरूपात रक्कम मागितल्याचे सिद्ध झाल्याने संशयित डेकाटेंविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनेनंतर डॉ. डेकाटे पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
तक्र ारीनुसार विभागाने शहानिशा करण्यासाठी सापळा रचला. तक्रारदार यांच्या खिशात ‘व्हाइस रेकॉर्डर’ ठेवून त्यांना डेकाटे यांच्या दालनात पाठविण्यात आले. यावेळी दुसºया तालुक्याचे अधिकारी डेकाटे यांच्याशी चर्चा करत होते तरीदेखील डेकाटे यांनी वेतनवाढ वाढविण्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी यावेळी तक्रारदाराकडे केली.
म्हणे, खासगी कामानिमित्त बाहेरगावी
डेकाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची कुणकुण लागल्यामुळे त्यांनी तत्काळ १ जूनपासूनच खासगी कामानिमित्त बाहेरगावी जात असल्याचे कारण सांगून रजा घेतली. यापूर्वी डेकाटे हे महापालिकेत वादग्रस्त अधिकारी ठरले होते. त्यानंतर डेकाटे यांना जिल्हा परिषदेत रुजू करून घेण्याबाबत सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून विरोध केला गेला होता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डेकाटे यांची दोन महिने विलंबाने नियुक्ती केली होती.


Web Title: The offense of asking a bribe against the health officials
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.