विनापरवाना सभा घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: August 30, 2015 22:42 IST2015-08-30T22:42:00+5:302015-08-30T22:42:34+5:30
विनापरवाना सभा घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा

विनापरवाना सभा घेणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची मंजुरी नसताना जाहीर सभा घेऊन भाषण केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश जारी केलेला असताना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिव मोहंमद रशीद मोहंमद अय्युब, मोहंमद फारुक गुलाम हुसेन रा. नयापुरा व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी रात्री आठ ते दहा वाजेदरम्यान मुशावरत चौकात वरील कार्यकर्त्यांनी जाहीर सभा घेतली. त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक सतीश पाटील यांनी फिर्याद दिली.
(प्रतिनिधी)