पिंपळगाव बाजार समितीस ओडिशाच्या शिष्टमंडळाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 14:20 IST2020-01-11T14:20:27+5:302020-01-11T14:20:35+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला ओडिशा राज्यातील अंगुल बाजार समितीच्या संचालक मंडळाने भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.

पिंपळगाव बाजार समितीस ओडिशाच्या शिष्टमंडळाची भेट
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला ओडिशा राज्यातील अंगुल बाजार समितीच्या संचालक मंडळाने भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. ओडिशात एकूण ५८ बाजार समित्या असुन चेअरमन पदावर शासनाचा अधिकारी असतो .व्हाईसचेअरमण व संचालक हे शेतकरी गटाचे असताता शासनाचे चेअरमन असल्याने शेतकरी हिताचे निर्णय तसेच बाजार समितीचा विकासाला अडचणी येतात. महाराष्ट्रातील बाजार समितीचा विकास हा चेअरमन व संचालकाना अधिकार असुन बाजार समिती शेतकरीच मालक असल्याने फक्त विकासच दिसतो. यातच पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे शेतकरी हिताचे निर्णय अशी सुविधा ओडिशात बघायला मिळत नसल्याची प्रतिक्र ीया अंगुल बाजार समितीचे व्हाईसचेअरमन बावरी महापात्रा यांनी दिली. बाजार समितीच्या कामकाजाबाबत आमदार दिलीप बनकर यांनी प्रत्यक्ष कांदा लिलावात भेट देऊन खुली लिलाव पध्दती बाबत शिष्टमंडळाला माहिती दिली. यावेळी अंगुल बाजार समितीचे संचालक तसेच पिंपळगाव बसवंत बाजार समितीचे संचालक सुरेश खोड, नारायण पोटे, सचिव संजय पाटील आदी उपस्थित होते.