सरकारी कामात अडथळा; तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 23:04 IST2020-06-23T23:03:36+5:302020-06-23T23:04:09+5:30
मालेगाव मध्य : रौनकाबाद येथे गटारीवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकास शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या माजी नगरसेवकासह तीन जणांना आझादनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

सरकारी कामात अडथळा; तिघांना अटक
मालेगाव मध्य : रौनकाबाद येथे गटारीवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकास शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या माजी नगरसेवकासह तीन जणांना आझादनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
सोमवारी दुपारी मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अधिकारी व कर्मचारी रौनकाबाद येथील सार्वजनिक शौचालयलगतच्या गटारीवरील पत्र्याचे शेड, कार्यालय, दुकाने व वाहनांचे अतिक्रमण काढत असताना माजी नगरसेवक नदीमुद्दीन अलीमुद्दीन ऊर्फ नदीम फिटर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून पथकास शिवीगाळ केली. कोरोना रोगाचा प्रसार होण्याचा संभव असतानाही मास्क न लावता व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. प्रभाग अधिकारी पंकज नामदेवराव सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नदीमुद्दीन अलीमुद्दीन ऊर्फ नदीम फिटर, समसुद्दीन कमालुद्दीन व सलमान अहमद रियाज अहमद सर्व, रा. रौनकाबाद यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.