शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘मुक्त’च्या आरोग्य अभ्यासक्रमाला हरकत

By admin | Updated: October 11, 2015 23:15 IST

आरोग्य विद्यापीठाची भूमिका : मुक्त विद्यापीठाला धाडणार पत्र

नाशिक : मुक्त विद्यापीठाने विज्ञान विद्याशाखेंतर्गत बीएएमएसनंतरचे पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आक्षेप घेण्याचे ठरविले असल्याचे वृत्त आहे. वैद्यकीय शाखेचे पदव्युत्तर अभ्यासक्रम केवळ आरोग्य विज्ञान विद्यापीठच राबवू शकते आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाची जबाबदारी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची असल्याची भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. गेल्या महिन्यात मुक्त विद्यापीठात झालेल्या विद्वत परिषदेने १८ नवीन अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. आगामी शैक्षणिक वर्षात प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर असे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्याचे ठरविले आहे. यामध्ये मुक्त विद्यापीठाने आरोग्य विज्ञान विद्याशाखेच्या अंतर्गत डिप्लोमा इन स्पोर्ट मेडिसिन, सर्टिफिकेट डिप्लोमा इन डायलेसिस क्लिनिकल असिस्टंट, तर पुण्याच्या भारत विकास शिक्षण संस्थेच्या सहकार्याने बीएमएमसनंतर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत जाहीर केले होते. त्याचप्रमाणे कायचिकित्सा (जनरल मेडिसिन, आयुर्वेद), स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र (गायनाकॉलॉजी आणि आॅबस्ट्रेट्रिक्स) कौमारभृत्य (चाईल्ड हेल्थ-आयुर्वेद) हे शिक्षणक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणाही करण्यात आली आहे.मुक्त विद्यापीठाच्या या निर्णयानंतर आरोग्य विज्ञान विद्यापीठाने याप्रकरणी मुक्तविद्यापीठ आणि संबंधित भारत विकास शिक्षण संस्थेशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा अभ्यासक्रम याच संस्थेच्या माध्यमातून आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुरू असताना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणे चुकीचे असल्याची भूमिका आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतली आहे. यासंदर्भातील कौन्सिलकडून घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या, अभ्यासक्रम हे सर्व आरोग्य विद्यापीठाने यापूर्वीच केलेले असतानाही मुक्त विद्यापीठाला अभ्यासक्रम राबविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचा दावा आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केला आहे. (प्रतिनिधी)