अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:09 IST2017-09-02T00:09:16+5:302017-09-02T00:09:56+5:30
‘अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता’ या गाण्याचे बोल ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उठले. एचआयव्हीबाधित मुलांच्या कंठातून ते गाणे ऐकताना गुरुवारी सर्वजण भावुक झाले. ‘श्वास एक, नवीन आस’ हे शीर्ष घेऊन मानवतेच्या सेवेसाठी २० वर्षं संगमनेर येथे कार्यरत असलेल्या, स्वयंप्रेरित सामाजिक विकास या संस्थेकडून गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रेरणा मिळावी.

अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता
नांदगाव : ‘अजाण आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता’ या गाण्याचे बोल ऐकताना श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उठले. एचआयव्हीबाधित मुलांच्या कंठातून ते गाणे ऐकताना गुरुवारी सर्वजण भावुक झाले. ‘श्वास एक, नवीन आस’ हे शीर्ष घेऊन मानवतेच्या सेवेसाठी २० वर्षं संगमनेर येथे कार्यरत असलेल्या, स्वयंप्रेरित सामाजिक विकास या संस्थेकडून गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रेरणा मिळावी.
या उद्देशाने नांदगावच्या युवा फाउण्डेशनने येथील चांडक सभागृहात संस्थेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात एचआयव्हीग्रस्त मुलांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार व नीलेश परभर यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. एचआयव्हीबाधितांसाठी १९९८पासून सदर संस्था काम करत आहे. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधून मुले आलेली आहेत. मुख्यत: वारांगनांची मुले यात असून, त्यांचा सर्वप्रकारे सांभाळ करण्यात येतो. संस्थेचे काम करणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे आहे. कारण या एचआयव्हीबद्दल समाजात असलेले गैरसमज होय. समाजाचा विश्वास मिळविताना आयुष्य खर्ची पडले. शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही. तरीही आम्ही आनंदी आहोत. मोडलेली आयुष्ये उभारताना मिळणारे सुख व समाधान जगातील कोणत्याही आनंदापेक्षा मोठे आहे. जनसेवा मित्रमंडळ व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या माध्यमातून कपडे व इतर चीजवस्तू, नस्तनपूर संस्थानकडून आर्थिक व भोजन सामग्रीची मदत मिळाली. कवडे यांच्या हस्ते पवार यांना सन्मानपत्र देण्यात आले. कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष राजेश कवडे, विधिज्ञ गुलाबराव पालवे, प्रा.सुरेश नारायणे, माजी सैनिक नानासाहेब काकळीज, स्मिता दंडगव्हाळ, आशा पवार उपस्थित होते. सुमित सोनवणे, आनंद घोडके, मयूर दाभाडे, प्रसाद वडनेरे, भोजराज सोनार, दिनेश पाटील, सुमित गायकवाड, लखन दाभाडे, विकास शर्मा, उबेद शेख, शंभूराजे, मोरया मित्रमंडळ, डॉ. गणेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.