शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

वादग्रस्त ठेकेदाराकडून पोषण आहार पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:45 IST

सेंट्रल किचन’च्या निविदाप्रक्रियेत बड्या राजकीय नेते आणि ठेकेदारांना सोयीने दिलेले १३ ठेके दिल्याचे महासभेत आढळल्यानंतर हे सर्व ठेके रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी दिला. मात्र आता पंधरा दिवस उलटूनही त्याच ठेकेदारांकडून शाळांना पोषण आहाराचा पुरवठा सुरू आहे. महासभेकडून ठराव अप्राप्त असल्याचे निमित्त करून प्रशासन सोयीने त्याच ठेकेदारांकडून पुरवठा करून घेत आहे.

ठळक मुद्देमहापालिकेची मेहेरबानी : महासभेचा ठराव प्राप्त नसल्याचे निमित्त

नाशिक : ‘सेंट्रल किचन’च्या निविदाप्रक्रियेत बड्या राजकीय नेते आणि ठेकेदारांना सोयीने दिलेले १३ ठेके दिल्याचे महासभेत आढळल्यानंतर हे सर्व ठेके रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी दिला. मात्र आता पंधरा दिवस उलटूनही त्याच ठेकेदारांकडून शाळांना पोषण आहाराचा पुरवठा सुरू आहे. महासभेकडून ठराव अप्राप्त असल्याचे निमित्त करून प्रशासन सोयीने त्याच ठेकेदारांकडून पुरवठा करून घेत आहे.राज्य शासनाने सेंट्रल किचन योजना राबविण्याचे आदेश दिल्यानंतर सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचा संदर्भ घेऊन महापालिकेने गेल्या लोकसभा निवडणुकीत निविदाप्रक्रिया राबविली. त्यात ३३ पैकी १३ पुरवठादारांना ठेके दिले. त्यातील बरेच ठेकेदार हे अपात्र तर आहेत, परंतु पुरवठ्यातदेखील गोंधळ आहे. शासनाने जास्तीत जास्त पुरवठादार येतील अशाप्रकारे २० लाख रुपयांची किमान उलाढाल करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ती चाळीस लाख करण्यात आली. अनेक कंपन्यांचे स्वतंत्र सेंट्रल किचन नाही तर काही जण उघड्यावरच अन्न शिजवत होते. त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी करून हवा बंद कंटेनरमधून अन्नाची वाहतूक करण्याची गरज असताना टेम्पो, रिक्षा अशा कोणत्याही साधनाने शाळांमध्ये भोजन पुरवठा सुरू होता. निविदाप्रक्रियेत गोंधळ तर होताच परंतु नंतरच्या सेवा बजावतानादेखील प्रचंड तक्रारी असूनही शिक्षण खात्याने डोळे झाक केली. त्यामुळे महासभेत हा सर्व प्रकार उघड झाला. त्यानंतर सर्व पक्षीय नेत्यांनी सेंट्रल किचनमधील गोंधळ एकेक करीत बाहेर काढले. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी ‘सेंट्रल किचन’चे तेरा ठेके रद्द करण्याचे आदेश दिले. तसेच यापुढील निविदाप्रक्रिया राबवितांना महिला बचत गटांना सामावून घेता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्याचे आदेश दिले. महापौरांनी आदेश देऊन पंधरा दिवस होऊन गेले तरी महासभेचा ठराव प्राप्त नाही आणि पर्यायी सोय नसल्याच्या नावाखाली याच ठेकेदारांकडून काम करून घेतले जात आहे. त्यामुळे प्रशासन एवढीमेहेरबानी या ठेकेदारांवर का दाखवित आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.केवळ निविदाप्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतच गोंधळ नव्हे तर भोजन पुरवतानादेखील अनेक प्रकारचे गोंधळ झाले. यासंदर्भात शाळांनी लिखित स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. एका शाळेच्या भोजनात गोगलगाय आढळली तर काही ठिकाणी कर्मचारीच वेळेत जात नसल्याने शिक्षकांना भोजन वाटपाची कामे करावी लागली. अनेक शाळात मापात माप करून भोजनाची पुरवठा कमी करण्यात आला. खरा नफा अपुरे भोजन पुरवठ्यातच आहे, तसेही प्रकार झाले. शाळांनी यासंदर्भात लेखी तक्रार करूनही शिक्षण विभागाने संबंधितांचे ठेके रद्द का केले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता महासभेत ठराव झाल्यानंतरदेखील पुन्हा त्याच ठेकेदारांकडून भोजन पुरवठा सुरू आहे.

टॅग्स :foodअन्न