फुलशेतीला शोधला रोपवाटिकेचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:04 IST2020-05-29T22:53:43+5:302020-05-30T00:04:19+5:30
कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे आणि याच गोष्टीचा परिणाम शेती व्यवसायाची साखळीपण तुटली आहे. मुख्य म्हणजे सुशोभित कार्यक्रम, लग्नसमारंभ तसेच धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फुलांचा वापर बंद झाल्याने फुलशेती पूर्णत: मोडकळीस आली आहे. असाच काहीसा प्रकार शिवनई तालुका दिंडोरी येथील पांडुरंग निवृत्ती गडकरी यांच्याबाबत घडला. परंतु त्यांनी न डगमगता फुलशेतीऐवजी फुले शेती काढून लाखो रुपये खर्च केलेल्या पॉलिहाउसचा वापर रोपवाटिकेसाठी करण्याचे ठरविले आणि त्यातून दिंडोरी, निफाड, नाशिक, चांदवड तालुक्यातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीसुद्धा रोपे उपलब्ध करून देऊ, असा प्रयत्न असल्याचे पांडुरंग गडकरी यांनी सांगितले.

फुलशेतीला शोधला रोपवाटिकेचा पर्याय
दिंडोरी : कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे आणि याच गोष्टीचा परिणाम शेती व्यवसायाची साखळीपण तुटली आहे. मुख्य म्हणजे सुशोभित कार्यक्रम, लग्नसमारंभ तसेच धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फुलांचा वापर बंद झाल्याने फुलशेती पूर्णत: मोडकळीस आली आहे.
असाच काहीसा प्रकार शिवनई तालुका दिंडोरी येथील पांडुरंग निवृत्ती गडकरी यांच्याबाबत घडला. परंतु त्यांनी न डगमगता फुलशेतीऐवजी फुले शेती काढून लाखो रुपये खर्च केलेल्या पॉलिहाउसचा वापर रोपवाटिकेसाठी करण्याचे ठरविले आणि त्यातून दिंडोरी, निफाड, नाशिक, चांदवड तालुक्यातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीसुद्धा रोपे उपलब्ध करून देऊ, असा प्रयत्न असल्याचे पांडुरंग गडकरी यांनी सांगितले.
पांडुरंग गडकरी यांनी २०११- १२ मध्ये सुरुवातीला सव्वा एकराच्या पॉलिहाउसमध्ये फुलशेतीला सुरुवात केली. त्यावेळी फुलाची मागणी वाढल्यामुळे त्यांनी पुन्हा सव्वा एकरमध्ये पॉलिहाऊस उभारून फुलशेती अडीच एकरात उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना साधारण खर्च पन्नास लाखापर्यंत आला होता.
या पॉलिहाउसमध्ये त्यांनी गुलाब जातीच्या दोन प्रकारचे गुलाब फुलाचे पीक घेतले. त्यात बोल्डेज, टॉप सिक्रेट यांचा समावेश होता. यामुळे साधारण उत्पन्न तीस ते चाळीस लाखापर्यंत उत्पन्न मिळत होते. त्यात बॅक हप्ते जाऊन दहा लाख शिल्लक राहत होते. गडकरी यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नोटाबंदीपासून पॉलिहाउस फुलशेतीला उतरती कळा लागली व आता यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतीचा कणा मोडून पडला आहे. त्यातून सावरण्यासाठी मी या शेतीचे रूपांतर रोपवाटिकेत केल्याचे गडकरी यांनी सांगितले.