मालेगावी बाधितांचा आकडा वाढता वाढे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 00:07 IST2020-05-19T23:01:14+5:302020-05-20T00:07:22+5:30
मालेगाव शहरात गेल्या तीन-चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांचा मंदावलेला वेग मंगळवारी (दि.१९) पुन्हा वाढला असून, दिवसभरात ३0 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगाव शहरातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे बाधित रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे पश्चिम भागातील आहेत.

मालेगावी बाधितांचा आकडा वाढता वाढे!
मालेगाव : शहरात गेल्या तीन-चार दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांचा मंदावलेला वेग मंगळवारी (दि.१९) पुन्हा वाढला असून, दिवसभरात ३0 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मालेगाव शहरातील प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे बाधित रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे पश्चिम भागातील आहेत.
शहरात मंगळवारी सकाळी आलेल्या चाचणी अहवालात २४ जण कोरोनाबाधित आढळून आले, तर काही तासांनी आलेल्या दुसऱ्या अहवालात पुन्हा ६ रुग्ण बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने बाधितांचा आकडा दिवसभरात ३0 वर जाऊन पोहोचला. मालेगाव शहरातील एकूण बाधितांची संख्या आता ६४८ झाली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत एकूण बाधितसंख्या ६१९ होती. त्यात दिवसभरात ३0 रुग्णांची भर पडली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून मिळणाºया बाधितांची संख्या घटत असताना मंगळवारी एकदम ३0 रुग्ण बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता १९० जणांचे तपासणी अहवाल आले. त्यातील १६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर त्यात बाधितांची संख्या २४ होती. यात १६ पुरुष, ८ महिला तसेच ३-४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. दुपारनंतर आलेल्या अहवालात पुन्हा ६ रुग्ण बाधित आढळून आले. यात रमजानपुरा, द्याने, बिदरबाग येथील प्रत्येकी एक तर शहरातील दोन जणांचा समावेश आहे. गेल्या तीन-चार दिवसात बाधितांचा वेग मंदावला असतानाच मंगळवारी त्यात पुन्हा भर पडली.
२६ जणांना डिस्चार्ज
सोमवारी (दि.१८) नवीन डिस्चार्ज पॉलिसीच्या धोरणानुसार शहरातील २६ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात मन्सुरा हॉस्पिटल व प्रशासकीय इमारत येथील एकूण १७, तर सहारा हॉस्पिटल येथून ३, एमएसजी कॉलेज येथून ४, फरान हॉस्पिटल येथून २ अशा २६ रुग्णांना नवीन धोरणानुसार डिस्चार्ज करण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच निगेटिह अहवाल येण्याचेही प्रमाण वाढले असल्याने आरोग्य यंत्रणेला तेवढाच दिलासा लाभत आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात १९० पैकी तब्बल १६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.