बाधितांचा आकडा आठशे पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 00:38 IST2020-06-16T23:20:48+5:302020-06-17T00:38:40+5:30
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोन दिवसांत आणखी झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (दि. १६) एकाच दिवसात तब्बल ७० रुग्ण आढळल्याने शहरातील बाधितांची संख्या आठशे पार झाली आहेत. आता ही संख्या ८०८ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल १९६ रुग्ण आढळल्याने शहरवासीय हादरले आहेत.

बाधितांचा आकडा आठशे पार
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दोन दिवसांत आणखी झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (दि. १६) एकाच दिवसात तब्बल ७० रुग्ण आढळल्याने शहरातील बाधितांची संख्या आठशे पार झाली आहेत. आता ही संख्या ८०८ झाली आहे. गेल्या तीन दिवसांत तब्बल १९६ रुग्ण आढळल्याने शहरवासीय हादरले आहेत.
सुमारे अडीच ते तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर शासनाने हळूहळू निर्बंध शिथिल करण्याची तयारी केली असून, त्याअंतर्गत लॉकडाऊनमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. तथापि, शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, बाजारपेठा सुरळीत झाल्याचा दुष्परिणाम सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणाबाहेर जात असून, तीन दिवसांपासून शहरात बाधितांची संख्या तर साठपेक्षा अधिक आहे. रविवारी (दि.१४) शहरात ५९ बाधित सापडले. त्यानंतर सोमवारी ६५, तर मंगळवारी तब्बल ७० रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच ही संख्या दोनशेच्या घरात गेली आहेत. तर दहाहून अधिक रुग्णांचे तीन दिवसांत मृत्यू झाले आहेत. त्यामुळे शहर हादरले आहे.
शहरातील बाधितांची संख्या विविध भागांतील असून, मंगळवारी (दि.१६) विविध भागांतील पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात नाशिकरोड भागातील खोले मळा येथील ४१ वर्षीय इसम, जाधवमळा, जुने नाशिक भागात सात जण तसेच पखालरोड येथील तीन जण, भोई गल्ली येथील दोनजण, रेणुकानगर, वडाळानाका, वडाळारोड, अशोकामार्ग येथील एक जण, शालिमार तर द्वारकावरील पौर्णिमा बस स्टॉपजवळ दोन जणांना त्याचप्रमाणे पाटीलनगर येथील एक नाईकवाडी पुरा, काठेगल्ली, बागवान पुरा, इंदिरानगर येथे एक गोरेराम लेन येथील एक सिडकोत बाजीप्रभू चौकात पाच, साईनाथनगर येथील एक असे रुग्ण आढळले आहेत.
---------------------
शहराभोवती आवळला फास
केवळ शहरातच नव्हे तर शहराभोवतीच्या परिसरातदेखील रुग्ण आढळत आहेत. भगूर पाठोपाठ देवळाली कॅम्प परिसरात तीन रुग्णं आढळले आहेत. तर नाशिक तालुक्यातील जलालपूर आणि चॉँदसी येथेही रुग्ण आढळले आहेत.