मालेगावी कोरोनाबाधितांची संख्या २५३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 18:36 IST2020-04-30T18:36:09+5:302020-04-30T18:36:17+5:30
मालेगाव : शहरात कोरोना-बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, एकाच दिवसात ८२ रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या २५३वर पोहोचली आहे.

मालेगावी कोरोनाबाधितांची संख्या २५३
मालेगाव : शहरात कोरोना-बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, एकाच दिवसात ८२ रुग्ण वाढल्याने बाधितांची संख्या २५३वर पोहोचली आहे. बुधवारी शहरात आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी
येऊन रुग्ण आणि व्यवस्थेची पाहणी करून परतताच तब्बल ८२ रुग्ण वाढल्याने शहरवासीयांना धक्का दिला. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत थांबून आरोग्यमंत्री टोपे, गृहमंत्री देशमुख, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यांनी बाधित रुग्णांवर उपचार सुरू असणाºया जीवन हॉस्पिटल, मन्सुरा आणि नवीन फरानी हॉस्पिटल येथे भेट देऊन पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि परिचारिका यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा आत्मविश्वास वाढविला. मिळणाºया सोई सुविधांविषयी विचारणा करून मालेगावात सर्व सोयी आणि साधने आरोग्य कर्मचारी वाढवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र मंत्रिमहोदय मालेगावातून जाताच पुन्हा झपाट्याने रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य विभाग परत एकदा हादरला असून, शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहरातील बकाल वस्ती, झोपडपट्टीचा भाग आणि साक्षरतेचा अभाव आणि कट्टर धार्मिक पगडा यामुळे प्रशासनाला रुग्ण शोधण्यात अडचण येत असून, केवळ अधिकारी बदलून नव्हे तर जे इथे अनेक वर्षे होते ज्यांना शहराची नस समजली आहे असे तत्कालीन प्रांत अजय मोरे आणि अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची मदत घेण्याची गरज आहे. कालपरवापर्यंत सात रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने नागरिकांत आशेचे वातावरण निर्माण झाले असतानाच रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण आहे. आता रुग्णसंख्या नियंत्रणात राखण्यासाठी सर्व यंत्रणांना लक्ष ठेवण्याची गरज आहे.