शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

अपघातातील मृतांची संख्या २६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:39 PM

देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्देमृतांवर अंत्यसंस्कार : रिक्षातील मयतांच्या वारसांनाही मदत जाहीर

नाशिक : देवळा-मालेगाव रस्त्यावरील मेशी फाट्याजवळील विहिरीत बस आणि रिक्षा पडून मंगळवारी (दि. २८) झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे. बुधवारी (दि. २९) सकाळी दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर १८ तासांनी मदतकार्य थांबविण्यात आले. मृतांवर त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहनमंत्री अनिल परब आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी देवळा-मालेगाव येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता धुळे-कळवण बस रिक्षेवर धडकल्यानंतर बससह रिक्षा विहिरीत पडली. या भीषण अपघातात २६ जणांचा बळी गेला. मंगळवारी रात्री २ वाजेपर्यंत विहिरीत अडकलेल्या २५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. परंतु, मदतकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे रात्री उशिरा थांबविण्यात आलेले मदतकार्य बुधवारी (दि.२९) सकाळी पुन्हा सुरू करण्यात आले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास निंबायती येथील दोन वर्षाच्या बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान, एनडीआरएफचे पथकही मदतकार्यात सहभागी झाले होते. घटनास्थळी विहिरीतून बाहेर काढलेल्या प्रवाशांचे सामान, चपला-बूट यांचा खच पडलेला होता, तर रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झालेला होता. रिक्षात असलेल्या मन्सुरी कुटुंबीयांतील आठ जणांचा बळी गेल्याने त्यांचे मूळ गाव येसगाव तर शोकसागरात बुडाले होते.रिक्षातील मयतांच्या वारसांना मदत जाहीरपालकमंत्री छगन भुजबळ, परिवहनमंत्री अनिल परब आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव-देवळा येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच रिक्षातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनीही घटनास्थळी पाहणी करतानाच जखमींची विचारपूस केली.अपघाताच्या कारणांचा शोध सुरूअपघाताच्या कारणांचा शोध परिवहन महामंडळाने सुरू केला आहे. जखमी प्रवाशांनीही चालकास जबाबदार धरले आहे. बसचे पुढील टायर फुटून सदर अपघात घडल्याचे प्रारंभी सांगितले जात होते; परंतु, विहिरीतून अपघातग्रस्त बस बाहेर काढल्यानंतर बसचे सर्व टायर्स सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे नेमका अपघात कशामुळे झाला, याची चौकशी परिवहन महामंडळाने आरंभली आहे.राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शोक संदेशअपघाताबद्दल राष्टÑपती आणि पंतप्रधान यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी शोकसंदेशात म्हटले आहे, महाराष्टÑातील नाशिकमध्ये झालेल्या अपघाताची घटना ऐकून दु:ख झाले. अपघातात प्राण गमावलेल्यांच्याप्रति संवेदना प्रकट करतो. जखमी व्यक्ती लवकरच बरे होवोत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्टÑाच्या नाशिकमध्ये घडलेला अपघात हा दुर्दैवी आहे. या दु:खदप्रसंगी मी मृतांच्या नातेवाइकांसोबत आहे. अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच इच्छा, असे ट्विट केले आहे.

टॅग्स :Accidentअपघात