हत्येच्या चौकशीकरीता नाभिक संघटनेचे इगतपुरीच्या तहसीलदारांना निवेदन सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:38 IST2020-09-28T16:37:16+5:302020-09-28T16:38:20+5:30
इगतपुरी : नागपुर जिल्ह्यातील कामठी या शहरात दाढी करण्याच्या कारणावरून नाभिक सलून व्यवसायिक सुदेश फुले यांची काही इसमांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असून अज्ञात आरोपीना गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.

इगतपुरी महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशन वतीने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना मान्यवर आदी.
इगतपुरी : नागपुर जिल्ह्यातील कामठी या शहरात दाढी करण्याच्या कारणावरून नाभिक सलून व्यवसायिक सुदेश फुले यांची काही इसमांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असून अज्ञात आरोपीना गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना महाराष्ट्र राज्य सलून असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.
या पार्श्वभूमीवर नाभिक समाज बांधवाला न्याय मिळावा तसेच त्यांचे मारेकरी यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच प्रमाणे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण व शासनामार्फत आर्थिक सहाय्य मिळावे सदर खटला जलद गती न्यायालय मध्ये चालविण्यात यावा अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, उपजिल्हाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, जिल्हा संघटक अशोक सूर्यवंशी, कायदेशीर सल्लागार सुनील कोरडे, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कोरडे, किरण कडवे, आदेश जाधव, कैलास जाधव, सोमनाथ साळूखे, अनिल सुरवंशी, जगन कोरडे, संदीप आंबेकर, रेवननाथ सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.