चक्रीवादळात जिल्ह्याला ३ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 18:47 IST2021-05-24T18:46:10+5:302021-05-24T18:47:23+5:30
जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ८२४३ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. दि १६ ते १९ मे या कलावधीत कळवण, देवळा, दिंडोरी,सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर,इगतपूरी, पेठ, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेतपीकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले.

चक्रीवादळात जिल्ह्याला ३ कोटींचा फटका
नाशिक: तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात झालेला पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि जोरदार पावसाच्या तडाख्याने सुमारे एक हजार हेक्टरवरील पीकांचे देखील नुकसान आले असून जवळपास ८५० घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पुर्ण झाल्यानंतर भरपाईसाठी शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे.
अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांना बसला.
वादळाचा वेग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले हेाते तर तालुकापातळीवर आपत्ती निवारण्याची तयारी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातला वादळाचा फारसा फटका बसणार नाही असा अंदाज वर्तविला जात असला तरी सुरगाणा, कळवण तसेच पेठ सारख्या आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांना या वादळाचा चांगलाच फटका बसला. अन्य तालुक्यांनाही थोडयाफार प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ८२४३ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. दि १६ ते १९ मे या कलावधीत कळवण, देवळा, दिंडोरी,सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर,इगतपूरी, पेठ, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेतपीकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले.