आता शहरातील टॅँकरव्दारे पाणी
By Admin | Updated: May 24, 2014 00:41 IST2014-05-24T00:20:22+5:302014-05-24T00:41:58+5:30
नाशिक- गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा असाताना देखील शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून आता संबंधीत भागास महापालिकेच्या वतीने टॅंकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे.

आता शहरातील टॅँकरव्दारे पाणी
नाशिक- गंगापूर धरणात पुरेसा पाणी साठा असाताना देखील शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून आता संबंधीत भागास महापालिकेच्या वतीने टॅंकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
शहरातील सिडको आणि अन्य भागात पाणी टंचाई जाणवत असून नागरीक त्रस्त झाले असल्याची तक्रार आज मनसेच्या नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली. गंगापूर येथील जलशुध्दीकरण केंद्रावरून सिडको विभागासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी विशेष जलवाहिनी टाकण्यात येत आहे, त्याबाबतही नगरसेवकांनी जाब विचारला. सदरच्या जलवाहिनीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच ती कार्यान्वीत होईल असे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी सांगितले. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून वीज पुरवठ्या अभावी शहराच्या विविध भागात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाणी पुरवठा होणार नसल्याचे महापालिका जाहिर करत नाही आणि टॅँकरव्दारे पाणी पुरवठा देखील केला जात नाही असे आमदार वसंत गीते यांनी सांगितले. त्यावर पालिकेकडे सहा विभागांसाठी सहा टॅँकर असून त्याव्दारे पाणी टंचाई जाणविणार्या भागात पाणी पुरवठा केला जाईल असे आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले.