शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
2
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
3
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
4
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
5
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
6
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
7
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
8
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
9
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
10
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
11
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
12
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
13
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
14
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
15
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
16
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
17
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
18
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
19
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
20
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान

आता नाशकात मास्क न लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 4:09 PM

नाशिक-  शहरात काेरोना बाधीतांची संख्या वाढत असताना मास्क न लावणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढ आहे त्या पार्श्वभूमीवर आता महाापालिकेने आणखी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून आता मास्क न लावणाऱ्यांना दोनशे ऐवजी पाचशे रूपयांचा दंड होईलच शिवाय गुन्हा दाखल होणार आहे. 

ठळक मुद्देआयुक्तांचे आदेश  दंड दोनशे ऐवजी पाचशे रूपये कोरोना चाचणीही होणार

 

नाशिक-  शहरात काेरोना बाधीतांची संख्या वाढत असताना मास्क न लावणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढ आहे त्या पार्श्वभूमीवर आता महाापालिकेने आणखी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून आता मास्क न लावणाऱ्यांना दोनशे ऐवजी पाचशे रूपयांचा दंड होईलच शिवाय गुन्हा दाखल होणार आहे. 

महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यासंदर्भात आदेश निर्गमीत केले असून ते स्वच्छता निरीक्षक आणि संबंधीना पाठवळे आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस कोरोना नियंत्रणात आल्यानंतर देखील केवळ आरोग्य नियमांचे पालन न झाल्याने पुन्हा कोरोना वाढत गेला आहे. इतकेच नव्हे तर गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वेगाने फैलाव होत आहे. महापालिकेने आधी दोनशे रूपयांचा दंड केला त्यानंतर एक हजार रूपये अशी दंडात वाढ केली. परंतु नंतर दंड वसुल करणे हा उद्देश नसल्याचे आयुक्तांनी सांगितले आणि दंडाची रक्कम पुन्हा दोनशे रूपयेच केली मात्र, त्यानंतरही सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्यांची संख्या वाढत असून दुसरीकडे दंड भरूनही नियमांचे उल्लंघन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आता दंडाची रक्कम वाढवून ती दोनशे ऐवजी पाचशे रूपये केली आहे. शिवाय मास्क न लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत. तसेच विनामास्क व्यक्तींना पकडून त्यांची स्वॅब घेऊन आरटीपीसीआर म्हणजेच कोरोना चाचण्या घेण्यात येणार आहे. 

 

 

 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या