आता पोस्टातून काढा कोणत्याही बॅँकेचे पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:26 PM2020-02-18T23:26:45+5:302020-02-19T01:00:30+5:30

इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक या देशातील सर्वात मोठ्या पेमेंट्स बँकेने आधार एटीएम ही नवी संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला आहे. आता तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असला तरी आधार संलग्न बँक खात्यावरून कोणत्याही पोस्ट बँकेच्या शाखेतून किंवा पोस्टमनकडून पैसे काढणे शक्य झाले आहे. त्यामुळे पोस्टमन मिनी एटीएम बनले आहे. डाक विभागाने कात टाकल्याचे चित्र असून, ग्रामीण भागात या सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

Now remove any bank money from the post | आता पोस्टातून काढा कोणत्याही बॅँकेचे पैसे

आता पोस्टातून काढा कोणत्याही बॅँकेचे पैसे

Next
ठळक मुद्देसेवा सप्ताह : पोस्टमन झाले एटीएम; डाक विभागाने टाकली कात

सिन्नर : इंडिया पोस्ट पेमेंट बॅँक या देशातील सर्वात मोठ्या पेमेंट्स बँकेने आधार एटीएम ही नवी संकल्पना राबविण्यास प्रारंभ केला आहे. आता तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असला तरी आधार संलग्न बँक खात्यावरून कोणत्याही पोस्ट बँकेच्या शाखेतून किंवा पोस्टमनकडून पैसे काढणे शक्य झाले आहे. त्यामुळे पोस्टमन मिनी एटीएम बनले आहे. डाक विभागाने कात टाकल्याचे चित्र असून, ग्रामीण भागात या सुविधेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
ग्रामीण भागात राष्टÑीयीकृत बॅँकेच्या शाखा नसल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठी सोय झाली आहे. पोस्टाने सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. या आठवड्यात सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका तीन दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोस्ट बँकेच्या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर डाक अधीक्षक आर. डी. तायडे, सहायक अधीक्षक संदीप पाटील, बँकेच्या नाशिक शाखेचे वरिष्ठ प्रबंधक राजेंद्र आघाव यांनी केले आहे.
एईपीएस या नावाने ही सेवा देशातील जवळपास सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये उपलब्ध झाली आहे. दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम आधार पडताळणी करून काढता येणे शक्य झाले आहे. ज्या भागात बँकेची शाखा नाही त्या बँकेच्या खातेदारांना आपत्कालीन परिस्थितीत मोठा आधार मिळणार आहे. आपला आधार क्रमांक हाच आता आपले एटीएम कार्ड असणार आहे. तुम्ही कोणत्याही बँकेचे खातेदार असला तरी पोस्ट बँकेत जाऊन तुमच्या खात्यावर असणाऱ्या शिल्लक रकमेतून दहा हजारापर्यंत व पोस्टमनकडून पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम आता सहजपणे काढता येणे शक्य झाले आहे.
घरबसल्या रक्कम काढणे शक्य
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माध्यमातून कोणत्याही बँक खात्यावरील रक्कम घरबसल्या काढता येणे शक्य झाले आहे. ग्रामीण भागात आणि लहान शहरांमध्ये ही सुविधा अधिक फायदेशीर ठरणार असल्याने पोस्ट विभागाकडून प्रत्येक तालुक्यात ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राजेंद्र आघाव यांनी दिली. दि. १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान बँकांना जोडून सुट्ट्या येत असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, मात्र येता संपूर्ण आठवडा पोस्ट बँकेने सेवा सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आहे. बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांना आपल्या नजीकच्या पोस्ट पेमेंट्स बँकेत जाऊन आधारसंलग्न भुगतान सेवेचा लाभ घेता येणार आहे.

Web Title: Now remove any bank money from the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.