..आता पोलिसांच्या कमरेला असेल दोरी अन‌् बेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:57+5:302021-02-05T05:37:57+5:30

शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांकडून गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि तत्काळ मुसक्या बांधण्याकरिता पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी कर्मचाऱ्यांना दंडुक्यासोबतच एक ...

..Now the police will have a rope around the waist | ..आता पोलिसांच्या कमरेला असेल दोरी अन‌् बेडी

..आता पोलिसांच्या कमरेला असेल दोरी अन‌् बेडी

शहर पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांकडून गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि तत्काळ मुसक्या बांधण्याकरिता पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी कर्मचाऱ्यांना दंडुक्यासोबतच एक बेडी आणि दोरखंडही देण्याचे आदेश दिले आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिसांच्या ‘खाकी’चा दोरी अन‌् बेडी हादेखील एक घटक होता; मात्र काळानुरुप केवळ खाकीसोबत पोलिसांकडे उरली ती त्यांची लाठी. दोरी, बेडी काळानुरुप वर्दीतून वजा झाली; मात्र पोलीस संहितेनुसार शहरातील पोलीस दल कार्यरत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले पाण्डेय यांनी पोलीस शिपायांना कमरेच्या पट्ट्यात दोरी आणि बेडी अडकविण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गुन्हेगारांमध्ये वचक निर्माण होण्यास मदत होणार आहे. कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचविणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जागेवरच अटक करण्याचा अधिकार पोलिसांना कायद्याने दिला आहे.

---

फोटो आर वर ०३पोलीस नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

030221\03nsk_37_03022021_13.jpg

===Caption===

पोलिसांच्या कमरेला आता दोरी अन‌् बेडी

Web Title: ..Now the police will have a rope around the waist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.