शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
2
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
3
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
4
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
5
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
6
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
7
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
8
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
9
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
10
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?
11
दोन वर्ष डेट केल्यानंतर बनले आयुष्याचे जोडीदार; जसप्रीत-संजनाची भारी लव्ह स्टोरी
12
या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय
13
काल शपथ अन् आता मंत्रिपद सोडण्याची इच्छा? सुरेश गोपी यांनी स्वतः केला खुलासा, म्हणाले...
14
मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?
15
PM Narendra Modi : जेडीयू-टीडीपी की भाजप, कोणाला मिळणार लोकसभा अध्यक्षपद? नेमकी चर्चा कोणाची
16
Love Life: 'या' राशीची बायको मिळाली तर तुमची काळजीच मिटली म्हणून समजा!
17
IND vs PAK : पाकिस्तानच्या खेळाडूंना आता घरी बसवा; भारताकडून पराभव होताच अक्रम संतापला
18
२८ वर्षांनी पुन्हा नायडूच किंगमेकर! 'त्या' वेळी देवेगौडा-गुजराल यांना बनवलं होतं PM
19
"दोन महिन्यांत संपत्तीबाबत माहिती द्या"; नवीन मंत्र्यांना पंतप्रधान मोदींचे निर्देश
20
चंद्राबाबू मुख्यमंत्री होण्यापूर्वी लक्ष्मीची झाली कृपा; कुटुंबाच्या संपत्ती १२ दिवसांत १,२२५ कोटींची तेजी

...आता मशिदींमध्ये नमाजपठणाला केवळ पाचच लोक : शहर-ए-खतीब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 6:25 PM

या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरित्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे.

ठळक मुद्देसर्व मशिदींमध्ये स्वच्छतेविषयक खबरदारी सरकारचे सर्व आदेश हे जनतेच्या आरोग्याच्या हिताचेआपआपल्या घरीच नमाजपठण करावे

नाशिक : शहरातील बहुतांश मुख्य दर्गांचे दरवाजे भाविकांच्या दर्शनासाठी ३१मार्चप्रर्यंत जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर संबंधित विश्वस्तांकडून बंद करण्यात आले. यानंतर आता शहरातील सुमारे ५०पेक्षा अधिक मशिदीदेखील ‘लॉकडाऊन’ करण्याचा निर्णय शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांनी मौलवींच्या बैठकीत घेतला. यामुळे आता मशिदींमध्ये दिवसाच्या तीन प्रहरांमध्ये पाचवेळा होणाऱ्या नमाजपठणाला केवळ चार ते सहा लोक (मौलवींसह) हजर राहतील असे जाहीर केले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपुर्ण राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता घरातून कोणही अनावश्यकरित्या बाहेर पडणार नाही. यामुळे शहरातील सर्वच मशिदींमध्ये नमाजपठणासाठी नागरिकांनी न जाता आपआपल्या घरीच नमाजपठण करावे, असे आवाहन खतीब यांनी केले आहे. पोलीस प्रशासनाला नागरिकांनी संपुर्णत: सहकार्य करावे, कोणीही घराबाहेर पडू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. सरकारचे सर्व आदेश हे जनतेच्या आरोग्याचय हिताचे असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून आपआपल्या घरातच थांबावे,असेही खतीब यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.शहरातील जुने नाशिक, वडाळागाव, नाशिकरोड, वडाळारोड, देवळाली कॅम्प, विहितगाव, सातपूर या सर्व भागांमधील मशिदींमध्येही नमाजपठणासाठी नागरिकांना जाता येणार नाही. नागरिकांनी नमाजपठणाकरिता घराबाहेर पडू नये, पोलिसांच्या सुचनांचे पालन करावे. कोरोना आजार हा अत्यंत जीवघेणा असून या आजारापासून स्वत:सह आपले कुटुंब आणि परिसराला सुरक्षित ठेवण्याकरिता सर्व शहरासह उपनगरांमधील नागरिकांनी आपआपल्या घरांमध्येच थांबणे गरजेचे आहे. मशिदींमध्ये केवळ मौलवी, मोअज्जिन (सेवेकरी) आणि दोन ते तीन ज्येष्ठ नागरिकच नमाजपठणाकरिता जाऊ शकतात. सर्व मशिदींमध्ये स्वच्छतेविषयक खबरदारी घेतली गेली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यMuslimमुस्लीमMosqueमशिद