शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

आता गज्वी, डॉ. मनोहर यांच्या नावाचा विचार होण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:18 IST

नाशिक : येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड व्हावी, अशी मागणी ...

नाशिक : येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांची निवड व्हावी, अशी मागणी करणारे निवेदन नाशिकच्या प्रज्ञा पर्व या संस्थेच्या वतीने संयोजन समितीला देण्यात आले आहे. तसेच प्रख्यात कवी, समीक्षक आणि कादंबरीकर डॉ. यशवंत मनोहर यांना नाशिकचे संमेलनाध्यक्ष करावे, अशी मागणी साहित्य रसिकांकडून करण्यात आली आहे.

गज्वी हे मराठीतील दिग्गज नाटककार असून, त्यांनी चौदा नाटके लिहिली आहेत. किरवंत, गांधी-आंबेडकर,अशी सरस नाटके लिहिणाऱ्या गज्वी यांनी एकांकिका, कविता, कथा आदी साहित्य प्रकारात लेखन केले आहे. तसेच गज्वी यांच्या जागर, हवे पंख नवे या कादंबऱ्यादेखील प्रकाशित आहेत. त्यामुळे गज्वी यांना नाशिक येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान मिळावे यासाठी प्रज्ञा पर्व संस्थेने लोकहितवादी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनावर अध्यक्ष वसंतराव रोहम, कार्याध्यक्ष नंदकिशोर साळवे, विजय होर्शिळ, एम.एल. नकोशे यांच्या सह्या आहेत, तर गत पाच दशकांहून अधिक काळ सातत्याने लिखाण करणारे कवी, समीक्षक आणि कादंबरीकार डॉ. यशवंत मनोहर यांच्या नावाचीदेखील मागणी रसिकांकडून होऊ लागली आहे. ते दलित साहित्याला आंबेडकरवादाची सैद्धांतिक भूमिका देणारे एक महत्त्वाचे विचारवंतदेखील म्हणून ओळखले जातात. शंभरहून अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. उत्थानगुंफापासून ते अग्निशाळेचे वेळापत्रकपर्यंतचा त्यांचा वाङ‌्मयीन प्रवास थक्क करणारा आहे. कवितेशिवाय अन्य लेखनातून आणि संपादनातून त्यांनी भारतीय समाजजीवनातील जातिव्यवस्था, संस्कृती, वेद, शास्र, पुराण आणि समकालीन स्थितीगतीसारख्या असंख्य विषयांवर रोखठोक भाष्य केले आहे.

इन्फो

गज्वींचे नाव दोन वर्षांपासून

महामंडळाच्या अधिकारानुसार मावळत्या अध्यक्षांना पुढील अध्यक्ष पदासाठी एकमेव नाव सुचविण्याची मुभा आहे. त्यानुसार लक्ष्मीकांत देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष पदावरून पायउतार होत असताना नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे नाव सुचविले होते. मात्र महामंडळाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी अरुणा ढेरे यांच्या नावाला पसंती दिली होती. त्यामुळे प्रेमानंद गज्वी यांचे नाव अध्यक्ष पदासाठी दोन वर्षांपासून चर्चेत आहे.

इन्फो

मनोहरांचे नाव अचानक चर्चेत

विदर्भ साहित्य संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवनव्रती’ पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना देण्यात येणार होता. त्यांनी प्रारंभी तो स्वीकारत असल्याचे सांगून नंतर सभागृहात सरस्वती देवतेची मूर्ती ठेवली जाणार असल्याने आपल्या जीवनदृष्टीनुसार हा पुरस्कार स्वीकारता येणार नसल्याचे गत आठवड्यातच कळवले. त्यामुळे गत दोन दिवसांपासूनच त्यांच्या नावाच्या चर्चेलादेखील प्रारंभ झाला आहे.

लोगो

साहित्य संमेलनाचा लाेगो वापरावा.