शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

आता महापालिकेतही दुरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटनांचे बार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 8:53 PM

नाशिक- महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या योजनांच्या अथवा कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचे बार उडविणे कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आता दुरदृष्य प्रणाली आणि अन्य अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई, दिल्लीतील नेत्यांकडून थेट उद्घाटने करण्याची चाचपणी सुरू आहे.

ठळक मुद्देउड्डाणपुलाचे काम करण्यासाठी दोन ठेकेदार नियुक्त

नाशिक- महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या योजनांच्या अथवा कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचे बार उडविणे कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आता दुरदृष्य प्रणाली आणि अन्य अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई, दिल्लीतील नेत्यांकडून थेट उद्घाटने करण्याची चाचपणी सुरू आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने अशा अनेक योजनांचे भूमिपूजन किंवा अन्य कार्यक्रम आभासी आणि दुरदृष्यप्रणालीद्वारे झाले आहेत. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेच्या अनेक योजनांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. सत्तारूढ भाजपाने मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथील नियोजित उड्डाणपुलाचे भूमिपूजन, बससेवेचे उद्घाटन, बस आगाराचे भूमिपूजन, कानेटकर उद्यानाचे नूतनीकरण आणि अन्य अनेक कामांचा प्रारंभ करण्याचे नियोजन केले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २२ फेब्रुवारीस काही प्रारंभ आणि भूमिपूजन करण्याचे ठरविले होते. मात्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. आता कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द होत असून त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. त्यामुळे आता अशाप्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे. भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी महापालिकेच्या आयटी सेलबरोबर यासंदर्भात प्रेझेंटेशन देखील तयार केले आहे.

महापालिकेच्या वतीने उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी दोन ठेकेदार नियुक्त करण्यात आले आहेत. आता या पुलांच्या कामावर देखभाल करण्यासाठी पीएमसी म्हणजेच प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच, आणखी एक ठेकेदार कंपनी सुपरव्हीजनसाठी नियुक्त करण्यात येणार असून त्यासाठी महापालिकेने आता निविदा मागवल्या आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी