शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

पाच खातेप्रमुखांसह  दहा जणांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 12:59 AM

नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे बड्या अधिकाऱ्यांना महागात पडले असून, पाच खातेप्रमुख तसेच अन्य पाच अधिकाºयांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये उपआयुक्त रोहिदास बहिरम, नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागुल, शहर अभियंता संजय घुगे यांचादेखील समावेश आहे.

नाशिक : नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणे बड्या अधिकाऱ्यांना महागात पडले असून, पाच खातेप्रमुख तसेच अन्य पाच अधिकाºयांना प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये उपआयुक्त रोहिदास बहिरम, नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागुल, शहर अभियंता संजय घुगे यांचादेखील समावेश आहे.  नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने ई कनेक्ट अ‍ॅप तयार केले असून, त्यातील तक्रारींची सात दिवसांच्या आत सोडवणूक करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास कनिष्ठ अधिकाºयांना आॅटो जनरेटेड नोटिसा बजावल्या जातात. परंतु वरिष्ठ अधिकारीच नव्हे तर खाते प्रमुखांनादेखील खाते आयुक्त आढावा घेतात. त्यानुसार महापालिकेच्या एनएमसी ई कनेक्ट अ‍ॅपच्या तक्र ारीकडे दुर्लक्ष करणाºया अधिकाºयांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश प्रभारी आयुक्तांनी दिले आहेत. सध्या महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे रजेवर असून, त्यांनी प्रभारी आयुक्त राधाकृष्णन यांना तक्रारींचा आढावा घेण्यास सांगितले त्यानुसार आढावा घेऊन त्यांनी नोटिसा बजावण्याचे आदेश दिले होते.यात नगररचना विभागाचे सहसंचालक आकाश बागुल, अतिक्र मण विभागाचे उपायुक्त रोहिदास बहिरम, आरोग्य व वैद्यकीय विभागाचे अधिकारी डॉ. जयराम कोठारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. सचिन हिरे, शहर अभियंता संजय घुगे व पालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापक उपायुक्त रोहिदास बहिरम यांचा समावेश आहे. याशिवाय सात दिवस उलटूनही तक्र ार प्रलंबित असल्याने सातपूर, सिडको, पश्चिम व पूर्व, नाशिकरोड, पंचवटी विभागीय अधिकाºयांनादेखील नोटीस बजावली जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका