शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

लोकसभा निवडणूक तयारीच्या पोलिसांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2019 00:28 IST

आगामी लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबच सराईत गुन्हेगारांचे तडीपाराचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी पोलीस यंत्रणेला दिल्या.

नाशिक : आगामी लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यापूर्वी निवडणूक प्रक्रियेत बाधा आणणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबच सराईत गुन्हेगारांचे तडीपाराचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी पोलीस यंत्रणेला दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी लागणारे पोलीस बळ, संवेदनशील मतदान केंद्रे व भरारी पथकासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या नेमणुका येत्या दोन दिवसांत करण्याचेही ठरले.लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य उत्पादन शुल्क, आयकर अधिकारी व सर्व निवडणूक अधिकाºयांची बैठक घेतली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंंद्राचा अभ्यास करून त्यात संवेदनशील व व्हर्नाबेल मतदान केंद्रे शोधून अशा मतदान केंद्राची सेक्टर अधिकारी, तहसीलदार व संबंधित पोलीस अधिकाºयांनी पाहणी करून त्या मतदान केंद्राच्या सुरक्षिततेचा आढावा घ्यावा त्याचबरोबर त्या ठिकाणी किती व कसा बंदोबस्त देता येईल याची माहिती गोळा करण्याचे ठरविण्यात आले. गेल्या निवडणूक काळात समाजकंटकांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती घेण्यात आली. किती लोकांना समन्स बजावले, तडीपार व प्रतिबंधात्मक कारवाई केलेल्यांवर यंदा बारीक लक्ष ठेवण्याचे व त्यांना नोटिसा बजावण्याचे ठरविण्यात आले. निवडणूक काळात बेकायदेशीर दारूचा साठा, विक्री व वाटप केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहितीही घेण्यात येऊन, सीमा चेक नाका, बेकायदेशीर पैशांचे वाटप करण्याचे प्रकाराबाबत जागरूक राहण्याचे ठरविण्यात आले. जिल्हास्तरीय बैठकीनंतर विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुखांची बैठक घेऊन त्यात विभागाचा आढावा घेण्यात आला.माहिती सादर करण्याच्या सूचनामतदान केंद्रनिहाय पोलीस बंदोबस्त, मतपेट्या, स्ट्रॉँग रूमच्या बंदोबस्तासाठी लागणारे बळ, केंद्रीय पोलीस दल, होमगार्डची संख्या याची माहितीही गोळा करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीत जिल्हा निवडणूक कार्यक्रमावर चर्चा करून निवडणूक अधिकाºयांनी सेक्टर आॅफिसर, मतदान केंद्रांचा रूट, कम्युनिकेशन प्लॅन, मतदान केंद्राची तयारी याबाबत आढावा घेण्यात आला. मतदानाशी संबंधित काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांची नावानिशी माहिती सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliceपोलिस