इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 00:21 IST2018-09-15T00:18:01+5:302018-09-15T00:21:33+5:30
गावठाणाबाहेरील कामे असतानाही गावठाण हद्दीतील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत.

इगतपुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस
नाशिक : गावठाणाबाहेरील कामे असतानाही गावठाण हद्दीतील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषद सदस्य अनिता बोडके यांनी इगतपुरी तालुक्यातील गावठाणाबाहेरील १० कामांबाबत पत्र दिले होते. त्यानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग १ यांचा अहवाल सादर केला होता. त्यानुसार ग्रामपंचायतीस दिलेला कार्यारंभ आदेश रद्द करण्यात आला आहे; मात्र सदर अहवालानुसार इगतपुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी कोणतीही शहानिशा न करता प्रस्तावासोबत १० कामे गावठाण हद्दीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र दिल्याने त्यांना नोटीस बजावून खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ल्ल मुंबई : म्हाडा सदनिकावाटप घोटाळ्याप्रकरणी आणखी दोन अधिकाºयांवर कारवाई केली जाईल. त्यांची चौकशी सुरू असल्याचे खेरवाडी पोलिसांनी सांगितले.
तसेच बेकायदा गाळे ताब्यात घेणाºया लाभार्थ्यांवर कारवाई होणार आहे.