गॅस वाहतूकदारांना नोटिसा
By Admin | Updated: May 8, 2014 22:53 IST2014-05-08T22:46:38+5:302014-05-08T22:53:44+5:30
नाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून गॅस सिलिंडरची वाहतूक करण्यास होणार्या विरोधामुळे नकार देणार्या वाहतूक ठेकेदारास ठेका रद्द करण्याची नोटीस बजावण्याच्या सूचना तेल कंपनीला देण्यात आली असून, अत्यावश्यक सेवेत बाधा आणणार्या वाहतूकदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत.

गॅस वाहतूकदारांना नोटिसा
नाशिक : मनमाडच्या पानेवाडी येथून गॅस सिलिंडरची वाहतूक करण्यास होणार्या विरोधामुळे नकार देणार्या वाहतूक ठेकेदारास ठेका रद्द करण्याची नोटीस बजावण्याच्या सूचना तेल कंपनीला देण्यात आली असून, अत्यावश्यक सेवेत बाधा आणणार्या वाहतूकदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत.
इंडियन ऑईल कार्पोरेशनने गॅस सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी गेल्या महिन्यात वाहतूक ठेकेदार नेमण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली असता, त्यात सर्वात कमी दर भरणार्या ठेकेदारांना त्याचे काम देण्यात आले. परंतु ज्याने कमी दरात ठेका घेतला त्यामुळे नुकसान होत असल्याची तक्रार करीत, अन्य वाहतूकदारांनी ठेका घेतलेल्या वाहतूकदारास मज्जाव केला. परिणामी गॅस सिलिंडरच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी बुधवारी दुपारी जिल्हा पुरवठा अधिकारी डी. बी. जवंजाळ यांच्या दालनात तेल कंपनीच्या विक्री प्रतिनिधी अय्यासुंदरम यांच्या समवेत बैठक झाली. कंपनीने जर नियमानुसार ठेका दिला असेल व ठेकेदारानेही तो घेतला असेल तर त्याने केलेल्या कराराप्रमाणे गॅस सिलिंडरची वाहतूक केलीच पाहिजे, अन्यथा त्याचा ठेका रद्द करण्याची नोटीस बजावण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या. वाहतूक ठेकेदारास जर अन्य व्यक्तींकडून त्रास होत असेल तर त्यासाठी पोलीस संरक्षण देण्याचीही तयारी दर्शविण्यात आली. याचबरोबर वाहतुकीस मज्जाव करणार्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या. वाहतूक ठेकेदारास ४८ तासांची मुदत देण्यात येणार असून, त्याने त्याचे पालन केले नाही तर ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जवंजाळ यांनी सांगितले. पानेवाडी येथून राज्यातील अनेक जिल्ांना इंडियन ऑईल कार्पोरेशनचे गॅस सिलिंडर वितरित केले जाते. परंतु नाशिक जिल्ात फक्त सोळा एजन्सी असून, त्याचे प्रमाण अवघे आठ टक्के इतके आहे. हा तिढा सुटला नाही तर कंपनीने चाकण येथून पुरवठा करण्याची तयारी केली आहे.