कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:18 IST2021-06-16T04:18:42+5:302021-06-16T04:18:42+5:30
अनेक शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे एकरकमी परतफेड करण्यास तयार आहे; मात्र जिल्हा बँकेकडून त्याबाबत कर्जफेड योजना राबविली जात नसल्याने अडचण ...

कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटिसा
अनेक शेतकरी राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे एकरकमी परतफेड करण्यास तयार आहे; मात्र जिल्हा बँकेकडून त्याबाबत कर्जफेड योजना राबविली जात नसल्याने अडचण निर्माण होत आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी फळबागा, सपाटीकरण, विहीर, पाईपलाईन, तसेच खरीप पिकांसाठी कर्ज घेतले; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे तो हतबल झाला आहे. त्यातच अवकाळी पावसासह कोरोनाच्या संकटानेही शेतकऱ्यांना बेजार केले आहे. बाजारभावही मिळत नसल्याने भांडवल उभे करणेही मुश्कील होऊन बसले आहे. गेल्या दहा ते बारा वर्षांत दिंडोरी तालुक्यासह जिल्ह्यात हजारो हेक्टर द्राक्षाबागाची लागवड झाली. परंतु, वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे या द्राक्षबागाचे उत्पादन घटले. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत गेला. अडचणीच्या काळात शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची अपेक्षा असताना जिल्हा बँकेकडून थकबाकीदार कर्जदारांना लिलावाच्या नोटिसा बजावल्या जात असल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर उमटत आहे.