शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉँगच्या भूखंडाला जप्तीची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:23 IST

नाशिक : महाराष्टÑ सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेले राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांपैकी पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिकच्या नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

ठळक मुद्दे भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का समीर भुजबळ तसेच पंकज भुजबळ आणि सत्येन आप्पा केसरकर हे संचालकआॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिकच्या नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली

नाशिक : महाराष्टÑ सदन आणि अन्य अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेले राष्टÑवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांपैकी पुतणे माजी खासदार समीर भुजबळ तसेच सुपुत्र पंकज भुजबळ यांच्या मालकीचा आॅर्मस्ट्रॉँग कंपनीचा भूखंड जप्त करण्याची नोटीस नाशिकच्या नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने बजावली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिलापूर शिवारात असलेल्या या कंपनीकडे ४ कोटी ३४ लाख ४३ हजार १८३ रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी नाशिक मर्चंट को-आॅप. बॅँकेने ही जप्तीची नोटीस बजावली आहे. या कंपनीसाठी कर्ज काढताना नाशिक मर्चंट बॅँकेकडे  जमीन गहाण ठेवण्यात आली होती. नाशिक तालुक्यातील सर्व्हे नंबर ७९५/ ३ पैकी २३ आणि ६ हे गट नंबर शेफाली भुजबळ तर ४ व ५ हे गट विशाखा भुजबळ यांच्या नावावर आहेत. या पाचही बिनशेती मिळकतीचे एकूण क्षेत्र ४ हजार २५० चौरसमीटर असून आॅफिसचे क्षेत्र ६००.४७ चौरसमीटर इतके आहे. थकबाकी भरण्यासाठी नाशिक मर्चंट बॅँकेने १ एप्रिल २०१७ पासून कर्ज परत फेड करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली होती. त्यामुळे ९ एप्रिल रोजी कलम १३(४) नियम ९ अन्वये प्रतीकात्मक ताबा घेतला आहे. १ एप्रिल २०१७ पासून थकीत रकमेसह परतफेड करण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे.आर्मस्ट्रॉँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून, त्याचे समीर भुजबळ तसेच पंकज भुजबळ आणि सत्येन आप्पा केसरकर हे संचालक आहेत. भुजबळ यांच्या मालकीच्या चिपाड तसेच अन्य साहित्यापासून वीजनिर्मिती करणारी कंपनी सुरू झाली आणि नंतर बंदही पडली.