नाशिक : कोरोना आजाराच्या प्रादूर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात परिमंडळ-१मधील विविध पोलीस ठाणे हद्दीतील ज्या व्यावसायिकांकडे गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा २५६ लोकांना नोटिसांद्वारे गर्दी टाळण्याच्या सुचना करण्यात आल्या. तसेच या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून दिला गेला. तरीदेखील रात्री उशिरापर्यंत काही व्यावसायिकांकडून आदेशाचा भंग झाल्याने पोलिसांनी अशा १८ लोक ांविरूध्द कायदेशीर गुन्हे नोंदविले.शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत; मात्र संशयितांची संख्याही अलिकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६३वर पोहचला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद अशा सर्वच शासकिय यंत्रणा युध्दपातळीवर राबत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडूनसुध्द अधिक खबरदारी घेतली जात आहे. जुगार अड्डयांवर पोलिसांकडून छापेमारी सुरू केली गेली आहे. याचबरोबर ज्या ठिकाणी गर्दी होत आहे, त्यावरदेखील पोलीस लक्ष ठेवून आहेत. गर्दीला कारणीभूत ठरणारे व्यावसायिकांवर (जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता) गुन्हे दाखल केले जात आहे. शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अशा १८ अस्थापनांविरूध्द पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये कापड दुकानदार, हॉटेलचालक, वॉइनशॅप, देशी दारू दुकाने, पानटपरीचालकांचा समावेश आहे.पोलीस ठाणेनिहाय बजावण्यात आलेल्या नोटिसाभद्रकाली- ५२सरकारवाडा-११गंगापूर -२२मुंबईनाका-७३पंचवटी-१६आडगाव-६७म्हसरुळ-१५
२५६ लोकांना इशारा नोटीस; १८ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 14:33 IST
शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अशा १८ अस्थापनांविरूध्द पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये कापड दुकानदार, हॉटेलचालक, वॉइनशॅप, देशी दारू दुकाने, पानटपरीचालकांचा समावेश आहे.
२५६ लोकांना इशारा नोटीस; १८ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल
ठळक मुद्देकोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटीव्ह लोकांना नोटिसांद्वारे गर्दी टाळण्याच्या सुचना