नाशिकरोड कार्यालयातील ६४ लेटलतिफांना नोटिसा

By Admin | Updated: July 13, 2017 00:35 IST2017-07-13T00:09:13+5:302017-07-13T00:35:08+5:30

नाशिकरोड कार्यालयातील ६४ लेटलतिफांना नोटिसा

Notice to 64 Latitiffs in Nashik Road Office | नाशिकरोड कार्यालयातील ६४ लेटलतिफांना नोटिसा

नाशिकरोड कार्यालयातील ६४ लेटलतिफांना नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात प्रशासन उपआयुक्तांनी अचानक भेट दिल्यानंतर ६४ कर्मचारी उशिराने आल्याचे निदर्शनास आले. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेच्या पंचवटी तसेच पूर्व विभागीय कार्यालयात यापूर्वी महापौरांसह प्रशासन उपआयुक्तांनी अचानक भेटी देऊन लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी बुधवारी (दि.१२) सकाळी १०.१५ वाजता नाशिकरोड विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली त्यावेळी ६४ कर्मचारी उशिराने कार्यालयात आल्याचे समोर आले. सदर कर्मचाऱ्यांना आता कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, समाधानकारक खुलासा न प्राप्त झाल्यास अर्ध्या दिवसाचे वेतन कापून घेण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या कोणत्याही विभागीय कार्यालयात कधीही केव्हाही तपासणी केली जाणार असल्याचे फडोळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Notice to 64 Latitiffs in Nashik Road Office