शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

पाणीपट्टी थकविणाऱ्या  ५७ हजार ग्राहकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 19:12 IST

महापालिकेचा अल्टीमेटम : सहा कोटी रुपयांची वसुली

ठळक मुद्देबंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार१० हजार ५५० नळजोडणीधारकांनीच थकबाकीचा भरणा भरण्यास प्रतिसाद दिला

नाशिक : महापालिकेने पाणीपट्टीची थकबाकी असलेल्या ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावल्या असून, त्यातील १० हजार ५५० थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. अद्याप ५७ हजार थकबाकीदारांनी भरणा न केल्याने संबंधितांची नळजोडणी बंद केली जाणार आहे. याशिवाय बंद केलेली जोडणी अनधिकृतपणे पुन्हा सुरू केल्यास संबंधितांवर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली आहे.महापालिकेने करवसुलीसाठी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. पाणीपट्टी थकविणाऱ्या  ६७ हजार ८३८ नळजोडणीधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातील १० हजार ५५० नळजोडणीधारकांनीच थकबाकीचा भरणा भरण्यास प्रतिसाद दिलेला आहे. सदर थकबाकीदारांकडून ६ कोटी १७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जे नळजोडणीधारक १५ दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम भरणार नाहीत, अशा नळजोडणीधारकांची जोडणी बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेने एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ या सात महिन्यांच्या कालावधीत १९ कोटी ९७ लाख रुपये पाणीपट्टी वसूल केलेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीपट्टी वसुलीत ९ कोटी २९ लाख रुपयांनी वाढ झालेली आहे. सर्वाधिक पाणीपट्टीची वसुली सिडको विभागातून ४ कोटी ७८ लाख रुपये झाली आहे, तर सातपूर विभागातून २ कोटी ५ लाख, पश्चिममधून ३ कोटी, पूर्वमधून ३ कोटी ५१ लाख, पंचवटीतून २ कोटी ७१ लाख, नाशिकरोडमधून ३ कोटी ८९ लाख रुपयांची वसुली झालेली आहे. दरम्यान, महापालिकेमार्फत अद्यापही असंख्य नळजोडणीधारकांना पाणीपट्टीची बिले जाऊन पोहोचलेली नाही. सुमारे वर्षभराच्या कालावधीत पाणीपट्टीची बिले न मिळाल्याने सोसायट्या, अपार्टमेंट यांना येणाऱ्या  बिलाची रक्कम मोठ्या प्रमाणात असणार आहे. त्यामुळे महापालिकेकडे त्याबाबत विचारणा होण्याची शक्यता आहे.इन्फोमालमत्ता करात १२ कोटींनी वाढमहापालिकेने गत वर्षाच्या तुलनेत १२ कोटी ५८ लाख रुपये जास्त घरपट्टीची वसुली केली आहे. गतवर्षी सात महिन्यांत ४५ कोटी १८ लाख रुपये मालमत्ताकर वसूल झाला होता. यंदा सात महिन्यांत ५७ कोटी ७६ लाख रुपये वसुली झाली आहे. महापालिकेने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत सवलत योजना राबविली होती. या सवलत योजनेतूनच महापालिकेला ३४ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. त्यानंतरच्या चार महिन्यांत महापालिकेने २३ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला आहे. सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या  ७६४४ मिळकतधारकांना ७ लाख ८० हजारांची तर पाच, तीन आणि दोन या टक्केवारीतून ८९ लाख रुपये सवलत देण्यात आलेली आहे. ई पेमेंट करणाऱ्या  ४१ हजार ८२१ ग्राहकांना ६ लाख ४१ हजाराची सवलत देण्यात आलेली आहे.

टॅग्स :WaterपाणीTaxकर