सोनल अधिकारी यांना लक्षवेधी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:13 IST2021-03-22T04:13:25+5:302021-03-22T04:13:25+5:30

चिंतामण निगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान नाशिक : मविप्र संस्थेचे कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. चिंतामण ...

Notable award to Sonal Adhikari | सोनल अधिकारी यांना लक्षवेधी पुरस्कार

सोनल अधिकारी यांना लक्षवेधी पुरस्कार

चिंतामण निगळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

नाशिक : मविप्र संस्थेचे कर्मवीर गणपतदादा मोरे महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. चिंतामण निगळे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी भूगोल विषयात ‘अ जॉगरफिकल स्टडी ऑफ टुरिझम इन नाशिक डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट’ या विषयावर संशोधनकार्य केले. त्यांना धुळे येथील जीईटी महाविद्यालयाचे डॉ. एस.के. शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.

एआयसीआयच्या राज्य उपाध्यक्षपदी गांगुर्डे

नाशिक : ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटलेक्च्युअल या जागतिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी रवींद्र रूपा गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेचे जनरल सेक्रेटरी ॲड. प्रकाश निधी शर्मा तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जीवीजी कृष्णमूर्ती यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आल्याचे संस्थेने कळविले आहे.

साक्षी श्रीवास्तव यांची उपाध्यक्षपदी निवड

नाशिक : येथील साक्षी तुषार श्रीवास्तव यांची अखिल भारतीय कायस्थ महसभा महिला प्रकोष्ठच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष सुनीता खरे यांच्यामार्फत नियुक्ती देण्यात आली. त्यांच्या निवडीचे समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान, श्रीवास्तव यांची नियुक्ती होताच त्यांनी महिलादिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

Web Title: Notable award to Sonal Adhikari