शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

स्मार्ट सिटी नको, पण आता रस्ता आवरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:32 IST

त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान सोडवून घेत असल्याने आता स्मार्ट सिटी नको, पण रस्त्याचे काम आवरा असे सांगण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देस्मार्ट सिटीला दिरंगाई : वारंवार मुदतवाढ देऊनही कामे अपूर्णच

नाशिक : त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान सोडवून घेत असल्याने आता स्मार्ट सिटी नको, पण रस्त्याचे काम आवरा असे सांगण्याची वेळ आली आहे.नाशिक शहरातील मध्यवस्तीच्या ठिकाणी असलेला त्र्यंबक रोड ते अशोक स्तंभ अत्यंत चांगला रस्ता होता. खरे तर तो का फोडला आणि नूतनीकरणाचे घाटले याचे कारण अखेरपर्यंत कळले नाही. परंतु जुन्या गावठाणाला जोडणारा रस्ता स्मार्ट करण्याचे नियोजन होते असे सांगण्यात येते, परंतु असेच असेल तर शहरात असे अनेक रस्ते आहेत, जे गावठाणाला तर जोडले आहेच, शिवाय त्यांची दुरवस्थादेखील झाली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने हे कोडे उलगडवले नाही तसेच त्याच्या खर्चाचे गणित कळेनासे झाले आहे. एक किलोमीटरसाठी थेट १७ कोटी रुपये करण्यात आल्याने शहरात अनेक कॉलनीरोड रखडलेले आहेत, किंवा खडीकरणदेखील झालेले नाही, मग केवळ याच रस्त्यासाठी इतका खर्च का केला जात आहे. शिवाय सतरा कोटी रुपयांता नक्की काय करणार आहेत याचा तपशीलदेखील बाहेर आलेला नाही.ठेकेदाराला वारंवार मुदत देऊनही तो काम पूर्ण करीत नसल्याने रस्त्याचे काम आणि बारा महिने थांब अशी प्रचिती येत आहे. अशीरेंगाळेली कामे स्मार्ट सिटीत होणार असतील तर त्यांना स्मार्ट का म्हणायचे किंबहूना आता स्मार्ट सिटी नको, पण रस्ता आवरा म्हणण्याची वेळ आली आहे.वर्षभरापासून रखडले कामसध्या या रस्त्यावरून वाद सुरू असून, रस्त्यामुळे सोडाच, परंतु रस्त्याकडे जाणारा सीबीएस मार्ग असो अथवा मेहेर या सर्वच ठिकाणी वाहतूक कोंडी सुरू आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू असून, त्यामुळे नागरिकांचे, शाळकरी मुले, शासकीय कर्मचारी आणि व्यावसायिकांबरोबरच स्थानिक रहिवासी अशा सर्वांचेच हाल होत आहे. परंतु त्यानंतरही महापालिका दखल घेण्यात तयार नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी