शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

...पण मोडला नाही रितेशचा कणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:47 IST

नाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या. घरातील सारं काही गोदावरीच्या पुरात गतवर्षी वाहून गेल्याने काही दिवस मावशीच्या घरी, तर काही दिवस एका ८ बाय ८ च्या खोलीत राहून रितेशने अभ्यासाचा ध्यास कायम ठेवला. दुसऱ्यांच्या घरी पोळ्या लाटायला जाणारी आई आणि किराणा दुकानात काम करणाºया वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत रितेशने तब्बल ९७ टक्के गुण मिळवत जिद्द आणि कष्टाला काहीच असाध्य नसते, याचीच प्रचिती दिली आहे.

ठळक मुद्देपुरात सारे वाहून गेले, तरीही जिद्दीच्या बळावर मिळवले तब्बल ९७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले !’ या कुसुमाग्रजांच्या प्रख्यात ‘कणा’ कवितेचीच क्षणोक्षणी आठवण व्हावी, अशाच साऱ्या घटना रितेश अजय भोपळे या दहावीतील कुशाग्र बुद्धिमत्तेच्या मुलाबाबतही घडल्या. घरातील सारं काही गोदावरीच्या पुरात गतवर्षी वाहून गेल्याने काही दिवस मावशीच्या घरी, तर काही दिवस एका ८ बाय ८ च्या खोलीत राहून रितेशने अभ्यासाचा ध्यास कायम ठेवला. दुसऱ्यांच्या घरी पोळ्या लाटायला जाणारी आई आणि किराणा दुकानात काम करणाºया वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत रितेशने तब्बल ९७ टक्के गुण मिळवत जिद्द आणि कष्टाला काहीच असाध्य नसते, याचीच प्रचिती दिली आहे.ज्याच्या जिद्दीला सलाम करावा असाहा रितेश सीबीएसवरील डी. डी. बिटको स्कूलचा विद्यार्थी! कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताचीच किंबहुना कठीणच. घरात लक्ष्मी नसली तरी सरस्वती मात्र नांदत आहे. कौटुंबिक परिस्थितीच्या जाणिवेतूनच रितेशने कष्टाने यश साध्य केले. त्याने दहावीच्या परीक्षेत ९७.५० टक्के इतके घवघवीत गुण मिळवले आहेत. रितेश पहिल्यापासूनच शाळेत अव्वल नंबर मिळवत आला. दहावीचे वर्ष हे महत्त्वाचे असल्याने त्याचा अभ्यास मध्यरात्री दोन वाजेपर्यंत चालायचा. घारपुरे घाट परिसरातील लहानशा घरात अभ्यास करताना परिसरातील गोंगाट चालायचा; परंतु सर्वाधिक त्रास गेल्या वर्षीच्या पुराचा झाला. गोदावरी नदीला आॅगस्ट महिन्यात आलेल्या पुराने होते नव्हते वाहून गेले. वह्या-पुस्तके, दप्तर सर्व गेल्यानंतरदेखील त्याने जिद्द बाळगली. कॉलेजरोडला मावशीकडे एका छोट्या क्वॉर्टरमध्ये राहुन त्याने अभ्यास केला. विशेष म्हणजे कॉलेजरोडवरून पायपीट करीत सकाळी ७ वाजता सीबीएसला शाळेत आणि तेथून परत घरी. दीड वाजता घारपुरे घाटावर पुन्हा क्लासला पायीच आणि नंतर तेथून पुन्हा साडेचार वाजेनंतर घरी असा प्रवास रोजच केला.रात्री दोन- दोन वाजेपर्यंत अभ्यास करणाºया रितेशने अखेरीस त्याला हवे ते यश प्राप्त केले आणि तब्बल ९७.२० टक्के यश मिळवले. रितेशच्या यशाने कुटुंबीय भारावून गेले आहे. रितेशची मोठी बहीणदेखील शिक्षणात पुढे असून, ती सध्या अभियांत्रिकी पदवीच्या अखेरच्या वर्षाला आहे आता रितेशने पुढे एमबीए करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे हेच त्याने दाखवून दिले.

टॅग्स :Studentविद्यार्थीssc examदहावी