दारुसाठी पैसे न दिल्याने लोखंडी गज टाकला डोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:06+5:302021-07-11T04:12:06+5:30

शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री सागर शरद सोनवणे (२८, रा. नेहरुनगर) हा युवक बसस्थानकातून बाहेर येत पायी जात होता. त्यावेळी ...

Not paying for alcohol put an iron fence in his head | दारुसाठी पैसे न दिल्याने लोखंडी गज टाकला डोक्यात

दारुसाठी पैसे न दिल्याने लोखंडी गज टाकला डोक्यात

शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री सागर शरद सोनवणे (२८, रा. नेहरुनगर) हा युवक बसस्थानकातून बाहेर येत पायी जात होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा असलेल्या अमित व्यवहारे याच्यासह अन्य दोघांनी सागरला थांबवून दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने तिघांनी मिळून सागरला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच संशयित अमितने त्याच्याकडील लोखंडी रॉड सागरच्या डोक्यात मारून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सागर जखमी झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तपास करून तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.१२) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Not paying for alcohol put an iron fence in his head