केवळ सहानुभूती नको, कायद्याची अंमलबजावणी हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:41+5:302021-09-25T04:14:41+5:30

बदलणे, महिलांना अधिकार आणि कायद्याची जाणीव करून देणे, राजकीय हस्तक्षेपाशिवाय एखाद्या घटनेचा तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करणे गरजेचे ...

Not just sympathy, law enforcement! | केवळ सहानुभूती नको, कायद्याची अंमलबजावणी हवी !

केवळ सहानुभूती नको, कायद्याची अंमलबजावणी हवी !

बदलणे, महिलांना अधिकार आणि कायद्याची जाणीव करून देणे, राजकीय हस्तक्षेपाशिवाय एखाद्या घटनेचा तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची पुरोगामी प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी महिला सुरक्षित असणे गरजेचे आहे, असे मत महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. डोंबिवलीत १४ वर्षीय मुलीवर ३० जणांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. यापूर्वी गत आठवड्यात मुंबईतील साकी नाका परिसरातील एक महिला अत्याचाराची शिकार ठरली. कल्याणमध्ये एक आठ वर्षीय बालिकेवर शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना घडल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

----

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यास प्रामुख्याने पुरुषी मानसिकता जबाबदार आहे. अशा प्रकारच्या घटना

रोखण्यासाठी सर्वप्रथम मानसिकतेत बदल आणि प्रबोधनाची गरज आहे. त्याचबरोबर प्रत्येक घटनेची सखोल, निष्पक्ष चौकशीची आवश्यकता

आहे. महिलांविषयीच्या कायद्यात बदल आणि त्यांची अंमलबजावणी देखील तितकीच गरजेची आहे.

- ॲड. विजया माहेश्वर,

मानव अधिकार कौन्सिल, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष

-----

राज्यात महिला अत्याचाराचे किळसवाणे प्रकार घडत असताना शासन बघ्याची भूमिका घेत आहे. महिलांचे संरक्षण करणारा शक्ती कायदा

रखडला आहे. महिला आयोगाला अध्यक्ष नाही. राज्य सरकारला महिलांचे संरक्षण करता येत नसेल, तर जिजाऊ ब्रिगेडला अधिकार प्रदान करावेत.

अशा प्रकारच्या घटना पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणाऱ्या आहे.

- माधुरी भदाणे,

प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड

-----

महिला, बालिकांवर घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना धक्कादायक आणि चिंतादायक आहे. या घटनांवर केवळ बाेलून किंवा नुसता निषेध व्यक्त

करून काहीही होणार नाही, तर कृती करण्याची गरज आहे. मुलींना शालेय वयापासून स्वसंरक्षणाचे धडे देऊन प्रतिकार करणे शिकवले पाहिजे.

त्याचबरोबर नुसते कायदे करून उपयोग नाही, तर त्यांची अंमलबजावणी देखील तितक्याच प्रभावी पद्धतीने झाली पाहिजे.

- आसावरी देशपांडे,

समन्वयक, प्रवरा मेडिकल ट्रस्ट

----

महिला सुरक्षा हा राजकारणाचा विषय नाही. ती सर्वांची जबाबदारी असून प्रत्येकाने ती पार पाडलीच पाहिजे. घटना घडल्यानंतर सर्वजण एकत्र

येऊन निषेध करतात, मग संरक्षणासाठी अशी एकजूट का होत नाही, हा खरा प्रश्न आहे. अशा प्रकारचे निंदनीय आणि किळसवाणे प्र्रकार

करणाऱ्यांना धडा शिकवणे हा यावरील प्रभावी उपाय ठरू शकतो.

- सरला चव्हाण, अध्यक्ष

आई तुळजाभवानी महिला बचतगट

---

आपल्याकडे महिलांचे संरक्षण करणारे अनेक कायदे आणि ते राबवण्यासाठी यंत्रणा आहे, मग असे प्रकार घडतात कसे, यावर विचार करण्याची

गरज आहे. सद्य स्थितीत अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक निर्माण केल्याशिवाय या घटना थांबणार

नाहीत. सद्य स्थितीत असणाऱ्या कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच नवीन कायदे आणण्याची देखील गरज आहे.

- शिल्पा जेऊघाले, कार्याध्यक्ष

आई फाउंडेशन, नाशिक

------- प्रतिक्रियांचे फोटो : आर ला आहे. --------

Web Title: Not just sympathy, law enforcement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.