शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

‘आपुलकी शहरात नव्हे खेड्यात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:10 IST

खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसाहित्यिक मेळावा : जन्मगावाच्या वेदनांचा नवनाथ गोरे यांनी उलगडला प्रवास

नाशिक : खेड्यातला माणूस चटणी-भाकर-कांदा खाऊन समाधानी आयुष्य जगत आला आहे. तेथील माणसामध्ये आपल्या गावाकडच्या माणसाविषयीची आपुलकी आहे. मात्र शहरामध्ये अशी आपुलकी जाणवत नाही, अशी खंत युवा साहित्य अकादमी पुरस्कार-२०१८ पुरस्कार प्राप्त ‘फेसाटी’ कादंबरीचे लेखक नवनाथ गोरे यांनी व्यक्त केली.निमित्त होते, सावानाच्या ५१व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या उद्घाटनाचे. उद्घाटन सत्रात गोरे यांची प्रकट मुलाखत मेळाव्याच्या अध्यक्ष व ‘लोकमत’च्या फिचर एडिटर अपर्णा वेलणकर यांनी घेतली. वेलणकर यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून गोरे यांच्या संघर्षमय प्रवासाची कहाणी उलगडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मुलाखतीच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात ‘फेसाटी’ या मथळ्यामागील पार्र्श्वभूमी सांगताना गोरे म्हणाले, राबराब राबून जेव्हा बैल थकतो तेव्हा त्याच्या तोंडातून फेस बाहेर येऊ लागतो. २०१६सालापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या माझ्या सांगली जिल्ह्यातील निगडी खुर्द गावातील गावकरीदेखील काबाडकष्ट उपसत कर्जाचा डोंगर उतरविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या संघर्षाची कथा मी मांडण्याचा प्रयत्न के ला, त्यामुळे ‘फेसाटी’ हा मथळा मला अधिक योग्य वाटल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, गावकऱ्यांची जिंदगी अस्मानी संकटाशी दोन हात करता करता सरत आहे. भारतात जरी दररोज बदल घडत असतील आणि नवनवे स्वप्न पूर्णत्वास जात असतील तरी माझ्या गावात आजही वीज ‘आकड्यां’मधून मिळवावी लागते. स्वातंत्र्यानंतर एकमेव बदल झालेला दिसतो तो म्हणजे आठ ते दहा कुटुंबांच्या घरी ‘टीव्ही’ आला. पाचवीलाच दुष्काळ पुजलेला असल्यामुळे तीस एकर जमिनीचा मालकदेखील कर्जबाजारी झाला आणि कर्जाचा डोंगर उतरविण्यासाठी त्याने हातात ऊसतोडीचा कोयता घेतला; मात्र आगाऊ रकमेची उचल असलेली मुद्दल फेडत व्याजरूपी कर्जाच्या रकमेत तो बुडत गेला. ही परिस्थिती आजही ‘जैसे-थे’ असल्याचे गोरे म्हणाले.जगण्याच्या ‘संघर्षा’ने सभागृह सुन्नबाभळीच्या कुंपणामधून वाट काढत माझ्या गावातील लोक जगण्याचा संघर्ष करताना आजही पहावयास मिळतात. नववीला असताना मुलीचे लग्न केले जाते आणि तीदेखील संसाराचा गाडा ओढण्यासाठी हातात कोयता घेत उसाच्या बागायती क्षेत्राकडे वळते. मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्टÑातील संघर्ष अन् काबाडकष्टाचा पट उलगडताना अवघे मु. शं. औरंगाबादकर सभागृह सुन्न झाले. सततच्या त्रासाची गावकºयांना इतकी सवय झाली की आता उद्रेकाची क्षमताही संपुष्टात आल्याची खंत गोरे यांनी बोलून दाखविली.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्य