उत्तर महाराष्ट्र कॉँग्रेस महिला कार्यकर्ता शिबिर
By Admin | Updated: April 8, 2015 01:16 IST2015-04-08T01:13:30+5:302015-04-08T01:16:18+5:30
उत्तर महाराष्ट्र कॉँग्रेस महिला कार्यकर्ता शिबिर

उत्तर महाराष्ट्र कॉँग्रेस महिला कार्यकर्ता शिबिर
नाशिक : केवळ भाषणे आणि आश्वासने देऊन ‘अच्छे दिन’ येत नाहीत, तर त्याला कृतीची जोड लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाची आणि गरिबांची चिंता नाही. ते पंतप्रधान व्हावेत म्हणून श्रीमंतांनी पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे ते गरिबांचे नव्हे, तर श्रीमंतांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका अखिल भारतीय कॉँग्रेसच्या प्रवक्ते व दिल्ली अध्यक्ष शोभा ओझा यांनी केले. तुपसाखरे लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्र कॉँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय सरचिटणीस चारूशीला टोकस, महिला कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष कमलाताई व्यवहारे, सचिव अश्विनी बोरस्ते, प्रवक्ते डॉ. हेमलता पाटील, सरचिटणीस योगीता अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहर अध्यक्ष शरद अहेर, वंदना मनचंदा, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. ममता पाटील, शहराध्यक्ष वत्सलाताई खैरे, उत्तम कांबळे, लक्ष्मण जायभावे, केशव पाटील, शोभा छाजेड, धुळे जि.प.अध्यक्ष सरला पाटील, अहमदनगर माजी जि.प.अध्यक्ष दुर्गाताई तांबे, पालघर जिल्हाध्यक्ष शमीमा शेख, धुळे महिला जिल्हाध्यक्ष गायत्री देवी, शहराध्यक्ष ललिता पवार आदि उपस्थित होत्या. ओझा पुढे म्हणाल्या की, कॉँग्रेसनेच तळागाळापर्यंत विकास ही संकल्पना रुजविली. महिलांना आरक्षण दिले. देशाला पुढे नेण्याची ताकद नारी शक्तीत आहे. देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी कॉँग्रेसच्या नेत्यांनी बलिदान दिले आहे. यापुढे महिलांनी कोणताही अन्याय व अत्याचार सहन न करता त्याला विरोध केला पाहिजे.